या अभिनेत्यानं सुरु केली फाटक्या जीन्सची फॅशन; आज महिलाही करतात फॉलो

कॉलेजमध्ये फ्रिल सॉक्स घालणं फारच हास्यास्पद आहे. त्याऐवजी प्लेन, ऍकंल-कट, लो-कट, नो-शो आणि टो-कवर सॉक्स वापरावेत. मोठ्या सॉक्स ऐवजी स्टॉकिंग्स घालावेत

फाटक्या कपड्यांची फॅशन भारतात सर्वप्रथम कोणी सुरु केली हे तुम्हाला माहिती आहे का? आजही लोक त्याच्या या फॅशनला फॉलो करताना दिसतात. (Ripped jeans fashion in India)

  • Share this:
    मुंबई 19 मार्च: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या महिला फाटके कपडे घालून का फिरतात? हे कसले संस्कार? असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला होता. (Ripped jeans) अर्थात त्यांच्या या वक्तव्यामुळं कपड्यांबाबत एक नवा वाद निर्माण झाला. परंतु या फाटक्या कपड्यांची फॅशन भारतात सर्वप्रथम कोणी सुरु केली हे तुम्हाला माहिती आहे का? आजही लोक त्याच्या या फॅशनला फॉलो करताना दिसतात. (Ripped jeans fashion in India) फाटक्या जीन्सला फॅशनच्या जगात रिप्ड जीन्स असं म्हणतात. 1990 साली ‘लीनर’ या अमेरिकी म्युझिक बँडनं सेंडिंग ऑल माय लव्ह या अल्बमसाठी रिप्ड जीन्स खास तयार करुन घेतल्या होत्या. त्याकाळी हा अल्बम सुपरहिट झाला अन् त्यासोबत त्यांच्या कपड्यांशी शैली देखील चाहते फॉलो करु लागले. भारतात ही फॅशन आणली ती सलमान खाननं. त्यानं आपल्या ‘प्यार किया तो डरना क्या?’ या चित्रपटात सर्वप्रथम रिप्ड जीन्सचा प्रयोग केला होता. चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यामध्ये तो फाटकी जीन्स घालून नाचताना दिसला. हे गाणं सुपहिट झालं अन् सोबतच त्यानं घातलेले कपडे देखील. लक्षवेधी बाब म्हणजे पुढे रिप्ड जीन्स परिधान करण्याचा ट्रेंडच सुरु झाला. आजही आपण खूप कूल आहोत किंवा पुरोगामी विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी अनेक जण फाटक्या जीन्स परिधान करतात. काही मोठ्या कंपन्या या जीन्सला लाखोंच्या किंमतींना विकतात. विशेष म्हणजे या जीन्सला जितकी ठिगळं पडलेली असतात तितकीच जास्त त्याची किंमत असते. अवश्य पाहा - गब्बरला मारताना दिसले होते ठाकूरचे हात; शोलेमधील Video होतोय व्हायरल काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत? “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं.” असा अनुभव त्यांनी सांगितला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published: