मुंबई, 25 नोव्हेंबर- स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट करणारी अभिनेत्री आहे. स्वरा नेहमी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी स्वरा सध्या अविवाहित आहे, पण तिला आई बनण्याची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्रीय दत्तक प्राधिकरण (CARA) अंतर्गत फॉर्मही भरण्यात आला आहे. स्वरा भास्कर केवळ चित्रपटांमध्येच सशक्त भूमिका करत नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही कठोर निर्णय घेणारी अभिनेत्री आहे. यंदा स्वराने दिवाळी अनाथ मुलांसोबत सण साजरा करताना दिसली. स्वराने तिच्या एका पोस्टमध्ये जगभऱातील अनाथ मुलांची माहिती शेअर केली आहे. तिनं म्हटलं आहे की, करोडो मूले अनाथाश्रमात राहतात.आता स्वरानेने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याने कायदेशीर प्रक्रियाही सुरू झाली आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्वरा म्हणाली की, ‘मला नेहमीच वाटत होते की मला एक मुल पाहिजे. मला वाटते की मूल दत्तक घेणे हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे मी माझी ही इच्छा पूर्ण करू शकतो. स्वरा भास्करने मिड डेशी संवाद साधताना सांगितले की, ‘मी स्वतःला भाग्यवान समजते की आपल्या देशात एकट्या महिलांना मुले दत्तक घेण्याची परवानगी आहे. यादरम्यान मली अनेक जोडप्यांना भेटले ज्यांनी मूल दत्तक घेतले आहे. मी त्यांची प्रक्रिया आणि अनुभव नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या या निर्णयावर माझे कुटुंब माझ्यासोबत आहे आणि मला पूर्ण पाठिंबा देत आहे.
वाचा : मराठी अभिनेत्रीने स्थापन केली स्वत:ची निर्मिती संस्था; श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते केलं उद्घाटन
स्वरा भास्करने मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला आहे. ही प्रक्रिया खूप लांब आहे. मूल दत्तक घेण्यापूर्वी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. स्वरा म्हणते की, ‘मला माहित आहे की दीर्घ प्रक्रियेमुळे मला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, यास 3 वर्षे लागू शकतात पण आता मी पालक होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही’. स्वरा भास्करने तिच्या भाचीच्या जन्मावर एक गाणे गायले होते, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.