मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मराठी अभिनेत्रीने स्थापन केली स्वत:ची निर्मिती संस्था; श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते केलं उद्घाटन

मराठी अभिनेत्रीने स्थापन केली स्वत:ची निर्मिती संस्था; श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते केलं उद्घाटन

प्राजक्ताने स्वत:ची Shiivoham Creations Private Limited नावाची निर्मिती संस्था स्थापन केली आहे. आज तिनं या संस्थेचे तिचे गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन देखील केले आहे.

प्राजक्ताने स्वत:ची Shiivoham Creations Private Limited नावाची निर्मिती संस्था स्थापन केली आहे. आज तिनं या संस्थेचे तिचे गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन देखील केले आहे.

प्राजक्ताने स्वत:ची Shiivoham Creations Private Limited नावाची निर्मिती संस्था स्थापन केली आहे. आज तिनं या संस्थेचे तिचे गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन देखील केले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर- प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी( prajakta mali). अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक, कवयित्री अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता प्राजक्ताने स्वत:ची Shiivoham Creations Private Limited नावाची निर्मिती संस्था स्थापन केली आहे. आज तिनं या संस्थेचे तिचे गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन देखील केले आहे. सोशल मीडियावरून तिनं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टावर एक व्हिडीओ व काही फोटो शेअर केले आहेत व म्हटलं आहे की,आज गुरूपुष्यामृत- गुरूवार;आणि आजच्या मुहूर्तावर माझ्या गुरूंच्या (गुरू श्री श्री रविशंकरजी) शुभहस्ते माझ्या ‘निर्मिती संस्थेचं’ उद्घाटन करण्यात आलं.“शिवोहऽम्” - Shiivoham Creations Private Limited.

त्रिवेणी आश्रम- पुणे इथे हजारोंच्या संख्येत जमलेल्या शिष्यांच्या भाऊगर्दीत मला त्यांना समक्ष भेटता आलं, त्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या.माझं #अहोभाग्य (screen वर नाव यायच्या आधीच ते “शिवोहऽम्” म्हणाले आणि आम्ही एकमेकांकडे बघत गोड हसलो. अविस्मरणीय.) हा योग साधता आला माझ्या आर्ट ॲाफ लिविंग च्या शिक्षकांमुळे, अशी पोस्ट प्राजक्ताने केली आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

काही दिवसापूर्वी प्राजक्ताचा 'प्राजक्तप्रभा' हा काव्यसंग्रह भेटीला आला आहे. आता तिनं मोठं पाऊल उचलत निर्मिती संस्था स्थापन केली आहे. यासाठी चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वाचा : It's Official! मराठी टेलिव्हिजनवर सलमान खान, Bigg Boss Marathi च्या चावडीवर भाईजानची एंट्री

प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती त्यांच्याशी संवादही साधत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. मोठ्या मेहनतीने तिने इंडस्ट्रीत स्वःला सिद्ध केले आहे.

वाचा: VIDEO: एका महिन्यात कमी करा 5Kg वजन; जॉन अब्राहमनं कपिल शर्माला दिल्या वेट लॉस टिप्स

अभिनयाव्यतिरिक्त ती उत्तम नृत्यांगणाही आहे. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगणा असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment