मुंबई, o6 डिसेंबर : बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या केवळ आपल्या सौंदर्यानेच नाही तर आपल्या शब्दांच्या बाणानेही घायाळ करतात. हे ऐकताना कंगना आणि तापसीची नावे मनात येतात, पण स्वरा भास्करही काही कमी नाही. स्वरा तिच्या कामापेक्षा तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच स्वरा सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर आपले मत मुक्तपणे मांडते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोल होते. स्वराने बॉलिवूडला एक-दोन नव्हे तर तब्बल 7 हिट चित्रपट दिले आहेत. पण आता तिला बॉलिवूडमध्ये कोणी काम देत नाही अशी व्यथा तिनेच मांडली आहे.
स्वरा भास्कर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. आता तिची हीच स्टाईल तिला महाग पडत आहेत. कारण बॉलिवूडच्या एक सो एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या स्वराला मात्र आता काम मिळणं कठीण झालंय. तिने स्वतःच याविषयी खुलासा केला आहे. स्वरा भास्करने नुकतीच एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने तिची व्यथा मांडली होती. अभिनेत्रीने सांगितले की "मला माझं काम सर्वात जास्त आवडतं. मी जाणीवपूर्वक जोखीम घेतली आणि या जोखमीची मोठी किंमत आहे. आता मला मिळायला हवं तेवढं काम मिळत नाहीये.''
हेही वाचा - Akshay Kumar : 'वेडात मराठे..'च्या शूटिंगपूर्वी अक्षयनं केलं असं काही; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात!
पुढे ती म्हणाली कि, ''मला मिळालेल्या संधींपेक्षा मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि मी अधिक चांगलं काम करण्यास सक्षम आहे. माझ्या कारकिर्दीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मी आतापर्यंत ६ ते ७ सुपरहिट चित्रपटांचा भाग आहे. यासोबतच मी एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. समीक्षकांनी माझ्या कामाला कधीही वाईट म्हटलं नाही. पण तरीही आता मला फारसं काम मिळत नाही.''
View this post on Instagram
स्वरा भास्करने आजपर्यंत सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली आहे. एवढेच नाही तर ती 'वीरे दी वेडिंग', 'निल बट्टे सन्नाटा', 'जहाँ चार यार'सारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसेच 'रसभरी' वेब सीरिजमध्ये स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत दिसली होती. स्वरा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अलीकडेच स्वरा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा भाग बनली होती. या प्रवासाचा एक भाग बनलेली स्वरा खूप चर्चेत आली. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्यावर टीका केली. यावेळी काढलेले फोटोही अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
तर दुसरीकडे इस्त्रायली चित्रपट निर्माते नादर लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला वल्गर म्हटले तेव्हा स्वरा त्याला सपोर्ट करताना दिसली. स्वराच्या या दोन रंगांमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. आता या सगळ्याचा परिणाम तिच्या करियरवर सुद्धा होताना दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.