जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshay Kumar : 'वेडात मराठे..'च्या शूटिंगपूर्वी अक्षयनं केलं असं काही; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Akshay Kumar : 'वेडात मराठे..'च्या शूटिंगपूर्वी अक्षयनं केलं असं काही; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात!

अक्षय कुमार

अक्षय कुमार

अक्षय कुमार त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या शूटिंगला सुरुवात करत आहे. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, o6 डिसेंबर : सध्या बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चीच सगळीकडे चर्चा आहे. आता एकीकडे त्याला हेरा फेरी २ चित्रपटात परतण्यासाठी चाहते विनंती करत असताना दुसरीकडे मात्र या खिलाडीने पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात देखील केली आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हिंदी चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. अक्षय कुमार त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या शूटिंगला सुरुवात करत आहे. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.  आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाऊंचे आशीर्वाद घेतले आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. आज त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यानिमित्त त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. हेही वाचा - Sayaji Shinde : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंवर चित्रपट निर्मात्याचे गंभीर आरोप या पोस्टमध्ये अक्षय कुमारने शिवरायांचे आशीर्वाद घेतानाचा एक झक्कास फोटो शेअर करत लिहिलंय कि, ’’ आजपासून माझा मराठी सिनेमा ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे, ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने प्रेरणा घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन! तुमचा आशीर्वाद राहू द्या.’’ अक्षयने केलेल्या या पोस्टने चाहत्यांचं  मन जिंकलं आहे.

जाहिरात

महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयची केलेली निवड अनेकांना अजिबात आवडलेली नव्हती. त्यामुळे नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर आणि अक्षयला भरपूर ट्रोल केलं होतं. तसेच इतर मावळ्यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. पण आता अखेर अक्षयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे, तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुझ्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे. आता या अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात