मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रानी चॅटर्जी पडली कॅप्टन अमेरिकाच्या प्रेमात; व्हिडीओ शेअर करत म्हटलं I Love You

रानी चॅटर्जी पडली कॅप्टन अमेरिकाच्या प्रेमात; व्हिडीओ शेअर करत म्हटलं I Love You

रानीने ख्रिसबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रानीने ख्रिसबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रानीने ख्रिसबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मुंबई 7 जुलै: रानी चॅटर्जी (Rani Chatterjee) ही भोजपूरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओलखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. हॉट आणि ग्लॅमरस फोटोंद्वारे ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क हॉलिवूड सुपरस्टार ख्रिस इव्हानमुळे (Chris Evans) चर्चेत आहे. I love you म्हणत तिनं ख्रिसबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुपरहिरो कॅप्टन अमेरिका (Captain America) या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेला ख्रिस इव्हान आज हॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अव्हेंजर्स एंडगेमनंतर भारतातही त्यांची लोकप्रियता कमालिची वाढली आहे. सई ताम्हणकरसारख्या अनेक मराठी अभिनेत्रींनी देखील त्याचे फॅन असल्याचं मान्य केलं. परंतु रानीने मात्र एक पाऊल आणखी पुढे जात त्याला थेट सोशल मीडियाद्वारे प्रपोज केलं आहे. अर्थात त्याने यावर अद्याप उत्तर दिलेलं नाही. परंतु रानी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. लाखो नेटकरी तिला फॉलो करतात या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमेरिका प्रतिक्रिया देईल असा विश्वास काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

दिलिप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; गांधीवाले म्हणत टाकलं होतं तुरुंगात

पाकिस्तानने राखला दिलीप कुमारांचा मान; बालपणीचा ठेवा कायमस्वरूपी जपला

रानी चॅटर्जी भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘ससुरा बडा पैसेवाला’ या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सिरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटात वयाच्या १६व्या वर्षी मादक दृश्य देत तिने भोजपुरी सिनेसृष्टीत खळबळ माजवली होती. त्यानंतर तिने ‘दामाद जी’, ‘फुल बने अंगार’, ‘रानी नंबर ७८६’, ‘रावडी रानी’, ‘घरवाली बाहरवाली’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. ‘मस्तराम’ या वेब सीरिजमध्ये दिलेल्या हॉट सीनमुळे सध्या ती प्रचंड चर्चेच होती.

First published:
top videos

    Tags: Actress, Entertainment