जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी वेब सीरिजला मिळणार हक्काचा प्लॅटफॉर्म; येतंय स्वप्निल जोशीचं OTT App

मराठी वेब सीरिजला मिळणार हक्काचा प्लॅटफॉर्म; येतंय स्वप्निल जोशीचं OTT App

मराठी वेब सीरिजला मिळणार हक्काचा प्लॅटफॉर्म; येतंय स्वप्निल जोशीचं OTT App

स्वप्निलनं अलिकडेच उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या मदतीने ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ नावाच्या एका कंपनीची सुरूवात केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 6 ऑगस्ट: स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवर मुंबई-पुणे-मुंबई, मितवा, तू हि रे, दुनियादारी यांसारख्या अनेक सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल गेली दोन दशकं सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Swapnil Joshi movie) मात्र आता तो केवळ अभिनयापुरता मर्यादित राहणार नाही. त्याने वेब सीरिज निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. स्वप्निल लवकरच एक नवं कोरं OTT प्लॅटफॉर्म घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (web series) यावर मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु अशा विविध भाषेतील सीरिज आणि चित्रपट पाहता येतील. Drug Case: दीपिका पादुकोणच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला स्वप्निलनं अलिकडेच उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या मदतीने ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ नावाच्या एका कंपनीची सुरूवात केली. ही कंपनी आतापर्यंत मराठी आणि गुजराती नाटक व चित्रपटांची निर्मिती करत होती. परंतु आता त्यांनी वेब सीरिजच्या क्षेत्रातही पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने मराठी वेब सीरिजला हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी ते एक OTT अ‍ॅपची सुरूवात करत आहेत. या अ‍ॅपचं नाव ‘लेट्सफ्लिक्स’ असं ठेवण्यात आलं आहे. यामुळे अनेक नव्या मराठी निर्मात्यांना आपल्या सीरिज आणि चित्रपट ब्रॉडकास्ट करण्याची संधी मिळेल असा विश्वास स्वप्निलनं व्यक्त केला आहे. ‘येऊ कशी तशी…’ ओम स्वीटूच्या कुटुंबाला परत मिळवून देणार त्यांच्या हक्काचं घर या नव्या प्रोजेक्टबद्दल स्वप्निल जोशी म्हणाला, “एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करायला हवे, असे मनात सतत घोळत होते आणि त्यातून ओटीटी व्यासपीठ सुरु करावे असा विचार गेली दीड वर्षे मनात होता. याच प्रक्रियेत मग ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीची स्थापना झाली. त्यासाठी काही समविचारी मित्र एकत्र आलो. आम्हाला लोकांना एक चांगले ओटीटी व्यासपीठ द्यायचे होते. दरम्यानच्या काळात, या प्रकल्पाबद्दल मी नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर माझे गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहेत. त्यांची आणि माझी व्यवसाय महत्वाकांक्षा, तत्त्वे अशा सर्वचपातळ्यांवर वेव्हलेन्थ जुळते. ओटीटीबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले की त्यांनीही ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली असून त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले. दोन्ही प्रकल्प एकत्र करून मोठ्या प्रमाणावर ओटीटी व्यासपीठ दाखल करायचे ठरले. या अ‍ॅपवर केवळ भारतीयच नाही तर विदेशी कार्यक्रम आणि चित्रपट देखील दाखवले जातील.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात