जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Prasad Oak: '...बाप कुणाला कळतो गं'; प्रसाद ओकसाठी पत्नी मंजिरीने लिहली खास पोस्ट

Prasad Oak: '...बाप कुणाला कळतो गं'; प्रसाद ओकसाठी पत्नी मंजिरीने लिहली खास पोस्ट

Prasad Oak: '...बाप कुणाला कळतो गं'; प्रसाद ओकसाठी पत्नी मंजिरीने लिहली खास पोस्ट

फादर्स डे निमित्त मंजिरीने (Manjiri Oak) आपल्या पती प्रसादसाठी (Prasad Oak) एक खास पोस्ट लिहिली आहे. काय आहे नेमकं या पोस्टमध्ये?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 जून: मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे त्यांचं काम जितकं चोख बाजवतात तितकेच चोख ते इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यात सुद्धा असतात. असाच एक जबाबदार अभिनेता- दिग्दर्शक आणि वडील म्हणजे (Prasad Oak) प्रसाद ओक. प्रसादने त्याचं काम आणि वडील एक पती म्हणून असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या वेळोवेळी पूर्ण केल्या आहेत. त्याच्या बायकोने म्हणजे मंजिरी ओकने (Manjiri Oak) त्याच्याकरता एक खास पोस्ट लिहिली आहे. मंजिरी आणि प्रसाद ही जोडी कायमच एकमेकांना सगळ्या कामांमध्ये सपोर्ट करत आली आहे. चंद्रमुखी चित्रपटाची धुरा सांभाळताना सुद्धा मंजिरी प्रसादसोबत कायम होती हे जाणवतं. आज मंजिरीने शेअर केलेल्या या पोस्टमुळे प्रसाद एक वडील म्हणून किती उत्तम आहे याचीसुद्धा जाणीव होत आहे. मंजिरी असं लिहिते, “प्रसाद happy fathers day 😍😍 ऊमगायाला सोपी आई , बाप कुणाला कळतो ग..❤️ हया ओळी जेंव्हा जेंव्हा ऐकते तेंव्हा तेंव्हा माझ्या डोळयात पाणी येतच . वडलांच इतक अचूक वर्णन मी हया आधी ऐकलच न्हव्हतं आणि हया वर्णना मध्ये तू एकदम perfect बसतोस .. 😊”

जाहिरात

मंजिरीने चंद्रमुखी (Chandramukhi) याच चित्रपटातील खास सवाल-जवाब हे गाणं या व्हिडिओमध्ये वापरलं आहे. या गाण्यात बापाचं उत्तम वर्णन करणाऱ्या समर्पक ओळी आहेत. त्याचा वापर करून तिच्या घरातील तीनही मुलं अर्थात सार्थक, मयंक आणि त्यांचा छोटा कुत्रा मस्कारा यांचा एक खास विडिओ तिने शेअर केला आहे. प्रसाद आणि मंजिरी यांना सार्थक आणि मयंक अशी दोन मुलं आहेत. दोघेही आता आपापल्या करिअरमध्ये नाव कमवत आहेत. त्याच्या मुलांचा चंद्रमुखी चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा बराच सहभाग होता. या चित्रपटात वडील मुलीच्या नात्याची एक खास गंमत आहे. त्यावर गाण्यातील एक कडवं सुद्धा लिहिलं आहे. हे ही वाचा- Father’s Day special: ‘बाबा आमचा सुपरस्टार’; मराठीतील कूल डॅडी आणि त्यांची मुलं प्रसादच्या वर्क फ्रंटवर सांगायचं तर त्याच्या दोन्ही चित्रपटांना घाघवीत यश मिळालं आहे. एकीकडे त्याने दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी चित्रपट तर दुसरीकडे त्याची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर चित्रपट दोघांचंही विशेष कौतुक होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात