मुंबई, 16 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच आहेत पण तो सध्या वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांचं मन जिंकत आहे. त्याची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो आई-वडिलांचं त्याच्या आयुष्यात किती महत्व आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ते असायला हवं याविषयी तो त्याचे मत स्पष्टपणे मांडत आहे. या त्याच्या विचारांवर त्याचे चाहते फिदा झालेत. ते सध्या स्वप्नील जोशींचं कौतुक करत आहेत. स्वप्नील जोशी त्याचा आईवडिलांसोबत एकत्र राहतो. तो त्याच्या आई वडिलांचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याची जुनी मुलाखत त्यानं शेअर केली आहे. त्यात त्याचे विचार ऐकून चाहते त्याच्यावर खुश आहेत. तो या व्हिडिओमध्ये आई वडिलांचे महत्व समजावून सांगत आहे. तो म्हणतोय, ‘तुमच्या आई-वडीलांची साथ असणं हिच तुमची खरी संपत्ती आहे. बाकी सगळ्या सुखांची खरेदी करता येते पण आई वडिलांचं प्रेम जपायला हवं ते दुसरीकडे कुठेच मिळत नाही.’ हेही वाचा - Ananya Film: वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियननं ‘अनन्या’ला दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO पुढे तो म्हणतोय कि, ‘मी आणि माझी बायको या बाबतीत खूप भाग्यवान आहोत कि आमच्या डोक्यावर २४ तास आईवडिलांचा हात आहे आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही राहतो.’ तसेच याच मुद्द्यावर तो पुढे सांगतोय कि, ‘आई वडिलांचं नुसतं आपल्यासोबत असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळते.’
स्वप्नीलचा हा व्हिडीओ आताचा नसून जुनाच आहे. पण त्याच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. ते या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत स्वप्नीलच कौतुक करत आहेत. त्याच्या विचारांना पाठींबा दर्शवत आहेत. त्याचा एक चाहता म्हणतोय कि, ‘स्वप्नील तू ग्रेट आहेस … तुझ्या विचारांना सलाम ‘, तर दुसरा चाहता म्हणतोय ‘खूप सुंदर विचार आहेत तुमचे, प्रत्येकाने हा विचार करायला हवा.’ अशाप्रकारे त्याचे चाहते त्याच समर्थन करत आहेत. स्वप्नील जोशी सध्या झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत काम करत आहे. त्याच्या या मालिकेला प्रेक्षक पसंत करत आहेत. या मालिकेत त्याच्यासोबत शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.