Home /News /entertainment /

लग्न न करण्यावरुन सुष्मिता सेनचा मोठा खुलासा, म्हणाली...

लग्न न करण्यावरुन सुष्मिता सेनचा मोठा खुलासा, म्हणाली...

सुष्मिता दोन मुलींची सिंगल मदर (Single Mother) आहे. तिने आजवर लग्न न करण्याचं कारण नेमकं काय? हा प्रश्न नेहमी तिच्या चाहत्यांना पडतो.

नवी दिल्ली, 1 जुलै : सन 2019 साली मिस युनिव्हर्सचा (Miss Universe) किताब जिंकणारी आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सतत तिच्या नव्या विचारांनी चाहत्यांना प्रेरित करत असते. सुष्मिता दोन मुलींची सिंगल मदर (Single Mother) आहे. तिने आजवर लग्न न करण्याचं कारण नेमकं काय? हा प्रश्न नेहमी तिच्या चाहत्यांना पडतो. मुलींची जबाबदारी असल्यानं तिने लग्न केलं नसावं असा तर्क लावला जातो; पण प्रत्यक्षात दोन्ही मुली आणि लग्न यांचा काहीएक संबंध नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. ‘माझ्या आयुष्यात काही पुरूष आले. पण ते नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. यात मुलींची जबाबदारी असल्याचा काहीच संबंध नाही,’ असं सुष्मिता खासगी आयुष्याबद्दल खुलेपणानं सांगते. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्या नातेसंबंधातील नाव समोर आला आहे. राजीवने त्याच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती लपवल्याचा आरोप चारूने लावला आहे. त्यामुळे ती घटस्फोट (Divorce) घेण्याच्या तयारीतही आहे. 2019 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. अवघ्या दोन ते तीन वर्षांत ते वेगळे होण्याचा विचार करत आहेत. हा वाद सुरू असतानाच सुष्मिताचं विवाहाबद्दलचं वक्तव्य समोर आलं आहे. हेही वाचा - कारमधून उतरताना अंकिता लोखंडेसोबत घडलं असं काही...,VIDEO समोर येताच झाली ट्रोल तीन वेळा विवाह करण्याची तयारी पण वाचले आपल्या मुलींची जबाबदारी हे लग्न न करण्याचं कारण नाही असं सांगणारी सुष्मिता तीन वेळा लग्न करण्याच्या मानसिकतेत होती. पण देवकृपनं आपण तो निर्णय घेतला नसल्याचं ती नमूद करते. सुष्मिताचं नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलशी ब्रेकअप (Break Up) झालं. पण मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून 28 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात रोहमन तिच्यासोबतच होता. आयुष्यात आलेल्या पुरूषांबद्दल केलं वक्तव्य सुष्मिताच्या लग्नावरून नेहमी ती चर्चेत असते. यावर बोलताना सुष्मिता म्हणते की, माझ्या आयुष्यात काही पुरूष आले. परंतु, ते निराश असल्याने मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. लग्न न करण्याचा निर्णय व मुली यांचा काहीही संबंध नाही. मुलींनी सर्वांचा सन्मान केला आहे. माझ्गया जबाबदाऱ्या इतर कोणासोबत वाटून घ्याव्यात, असंही मला कधी वाटलं नसल्याचं सुष्मिताने ट्विंकल खन्नाने घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. तीन वेळा मी लग्न करण्याचा निर्णय घेणार होते; पण देवकृपेने यातून वाचले. माझ्या आयुष्यात अनेकवेळा संघर्षाचा काळ आला. पण देवाची कृपा असल्यानं त्यातून बाहेर पडल्याचं तिनं सांगितलं. सुष्मिता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने आजही चाहत्यांच्या मनात घर केलेले आहे. 1996 मध्ये पहिल्यांदा तिने महेश भट्ट दिग्दर्शित ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलीवूड करिअरला सुरूवात केली. ‘बीवी नं.1’, ‘फिजा’, ‘आँखें’, ‘मैं हूँ ना’, ‘और मैंने प्यार क्यों किया?’ यासारख्या चित्रपटांतून सुष्मिताने चाहत्यांवर अभिनयाची छाप पाडली आहे. 2020 मध्ये आर्या वेब सीरिजच्या माध्यमातून तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पर्दापण केलं. मागील वर्षी याच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती दिसली होती.
First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Sushmita sen wedding

पुढील बातम्या