जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कारमधून उतरताना अंकिता लोखंडेसोबत घडलं असं काही...,VIDEO समोर येताच झाली ट्रोल

कारमधून उतरताना अंकिता लोखंडेसोबत घडलं असं काही...,VIDEO समोर येताच झाली ट्रोल

कारमधून उतरताना अंकिता लोखंडेसोबत घडलं असं काही...,VIDEO समोर येताच झाली ट्रोल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (TV Actress) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जुलै-   छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (TV Actress) अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande) तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बऱ्याचवेळा आपल्या फोटोंसह व्हिडिओ शेअर करत असते. पापाराझीसुद्धा अनेकदा इव्हेंट्स आणि अवॉर्ड शोमध्ये त्यांना कॅमेऱ्यात कैद करतात. नुकतंच अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Viedo) होत आहे. ज्यामध्ये तिने इतका डीप नेकचा ड्रेस परिधान केला होता की, ज्यामध्ये ती अस्वस्थ वाटत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला ट्रोल करत आहेत. अंकिता लोखंडे नुकतंच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटसाठी तिने अत्यंत डीप नेकचा चमकदार गाऊन परिधान केला होता. मात्र कारमधून उतरताना अंकिता आपल्या ड्रेसचा डीप नेक आपल्या हाताने कव्हर करताना दिसून आली. या ड्रेसमध्ये ती अस्वस्थ दिसून येत होती. सतत ती क्लिव्हेज लपवण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

जाहिरात

एका व्यक्तीने व्हिडीओवर कमेंट करत लिहलंय- ‘तुम्ही कम्फर्टेबल नसताना असे कपडे घालून का बाहेर जाता.’ तर दुसऱ्या एकाने लिहलंय, ‘मग असे कपडे परिधान करायला कोणी सांगितलं.तर आणखी एका यूजरने लिहिलंय ‘आता तर राखी सावंतही सुधारली पण यांनी आता असे कपडे परिधान केले आहेत.’ **(हे वाचा:** अंकिता लोखंडेने ‘क्यूंकी सास भी बहू थी’ स्टाईलमध्ये शेअर केला VIDEO; दाखवली नव्या घराची पहिली झलक ) अंकिता लोखंडे आणि विकी जैनने नुकतंच ‘स्मार्ट जोडी’ हा रिऍलिटी शो जिंकला होता. यामध्ये त्यांनी २५ लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली होती. दरम्यान आता या दोघांनी आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या सोशल मीडियावरून आपल्या नव्या घराची झलकसुद्धा शेअर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात