मुंबई, 10 जुलै : अभिनेत्री सुश्मिता सेन मागच्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र नंतर सुश्मिताच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे या सर्व फक्त अफवा असल्याचं समोर आलं. पण आता सुश्मिता एका नव्या कारणानं चर्चेत आली आहे. सुश्मितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावरून तिच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होत असून तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरलही होत आहे. सुश्मितानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक्सरसाइजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बॅक एक्सरसाइज करताना दिसत आहे. 43 वर्षीय सुश्मिताचा फिटनेस पाहिल्यावर थक्क व्हायला होतं. या व्हिडिओला सुश्मितानं, ‘कंट्रोल फक्त भ्रम आहे. पण बॅलन्स रिअल आहे.’ असं कॅप्शन दिलं आहे. सुश्मिता नेहमीच स्वतःला फिट ठेवते. ती सोशल मीडियावर अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. पण तिचा हा व्हिडिओ मात्र खूप जास्त व्हायरल होत आहे. काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखातीत सुश्मितानं इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधणं ही माझी स्वतःची निवड आहे हे कबुल केलं होतं. मी रिअल लाइफमध्ये कशी आहे हे माझं सोशल मीडिया अकाउंट सांगतं असं ती यावेळी म्हणाली. …तर हृतिक रोशन-दीपिका पदुकोण पहिल्यांदाच ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र
सुश्मिता तिच्या इन्स्टाग्रामवर अनेकदा बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत फोटो शेअर करत असते. तसेच त्या दोघांचे अनेक जिम व्हिडिओ सुद्धा हे दोघंही नेहमी शेअर करत असतात. लवकरच सुश्मिता लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. मात्र ती वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुश्मितानं सांगितलं होतं की आता माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे मी आता पुन्हा एकदा बलिवूडमध्ये परण्याचा विचार करत आहे. खूप मोठा ब्रेक झाला असल्यानं ही माझी पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात असणार आहे. टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल ============================================================== SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?