...तर हृतिक रोशन-दीपिका पदुकोण पहिल्यांदाच ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र

दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन फराह खानच्या आगामी सिनेमामध्ये दिसण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 01:06 PM IST

...तर हृतिक रोशन-दीपिका पदुकोण पहिल्यांदाच ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र

मुंबई, 10 जुलै : अभिनेता हृतिक रोशन त्याचा आगामी सिनेमा ‘सुपर 30’ मुळे खूप चर्चेत आहे. हा सिनेमा येत्या 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या हृतिक या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण या सिनेमानंतर हृतिक लगेचच त्याच्या दुसरऱ्या एका सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे आणि या सिनेमात हृतिक सोबत दीपिका पदुकोण स्क्रिन शेअर करणार असल्याचं बोललं जात आहे. असं झाल्यास दीपिका-हृतिक हे जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन फराह खानच्या आगामी सिनेमामध्ये दिसण्याची शक्यता आहे. हा सिनेमा 'सत्ते पे सत्ता' या हिंदी सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाची निर्मिती रोहित शेट्टी करत असून सुरुवातीला या सिनेमासाठी शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शेवटी फायनल लिस्टमध्ये हृतिकच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. मात्र या सिनेमासाठी अभिनेत्रीची निवड अद्याप बाकी आहे.

VIDEO : प्रभूदेवा-सलमानचा डान्स क्लास, भाईजानचा 'हा' अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल

Loading...

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकसाठी फराह खान आणि रोहित शेट्टी यांची पहिली पसंती दीपिकाला आहे. त्यांच्या मते दीपिका 'सत्ते पे सत्ता'मध्ये हेमा मालिनी यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी योग्य आहे. याशिवाय हेमा मालिनींचं सौंदर्य फक्त दीपिकाच मोठ्या पडद्यावर साकारू शकते. त्यामुळे या दोन स्टार्सना घेऊन हा सिनेमाची निर्मिती केली गेली तर ही त्याच्या चाहत्यांसाठी ट्रीट असणार आहे. कारण या सिनेमाच्या निमित्तानं दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र दीपिकाकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

भारत- न्युझीलंड सामन्यादरम्यान हा खेळाडू फिरतोय क्रोएशिया आणि इटलीत

दीपिका सध्या पती रणवीर सिंहसोबत ‘83’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय लवकरच तिचा 'छपाक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर हृतिकचा ‘सुपर 30’ येत्या 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिलीजसाठी अवघे दोन दिवस उरले असताना सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या काही बदलांमुळे आता हा सिनेमा अडचणीत सापडला आहे. या सिनेमातील काही संवादांवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डानं ते संवाद काढून टाकण्यास सांगितलं आहे. याशिवाय हृतिक लवकरच टायगर श्रॉफसोबत एका अ‍ॅक्शन सिनेमामध्ये दिसणार आहे.

पत्रकाराशी पंगा घेणं कंगनाला पडणार भारी, मीडियानं घेतला ‘हा’ निर्णय

==================================================================

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...