मुंबई 17 जुलै: ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपने सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. या बातमीनंतर सुष्मिता आणि ललित यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंबद्दल चर्चा होताना दिसत होती. ललित यांचं पहिलं लग्न, सुष्मिताची आधीची चर्चित अफेअर याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. आज ललित यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या सगळ्यावर स्पष्टपणे आपलं मत मांडलं. आणि सुष्मिता सेनने सुद्धा ट्विटरवर ट्रोल करणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आपलं मत मांडलं आहे. सुष्मिता आणि ललितच्या नात्यावर अनेकांनी मिम्स बनवले तर अनेकांनी (Sushmita Sen instagram post) सुष्मिताला गोल्ड डिगर असं संबोधलं होतं. त्यांच्या नात्याबद्दल तर्हेतर्हेच्या चर्चा होत होत्या या सगळ्यावर उत्तर देत सुष्मिताने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे, “काही कथित बुद्धीजीवी लोक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तर्हा…. त्यांच्या हीन दर्जाचे आणि कधीकधी मजेदार गॉसिप आणि गप्पा. अज्ञानी असलेले आणि मला कधीही न भेटलेले माझे मित्र आणि मी कधीच भेटले नाही असे ओळखीचे.. सर्वच त्यांची दिव्य मतं आणि माझ्या खाजगी आयुष्याबद्दल आणि चारित्र्याबद्दलचे सखोल ज्ञान शेअर करत आहेत… कमाई करत आहेत. मला ‘गोल्ड डिगर’ म्हणत आहेत!!! या हुशार लोकांना कोण सांगणार मी मी सोन्याहून खोल विचार करते आणि मी नेहमीच हिऱ्यांना प्राधान्य दिलं आहे आणि हो मी अजूनही ते स्वतः विकत घेते.” तसंच तिच्या चाहत्यांना उद्देशून तिने आभार मानले आहेत. “माझ्या शुभचिंतकांचं मनापासून असणारं समर्थन मला भावतं आणि ते पुढेही देत राहतील. कृपया जाणून घ्या, तुमची सुश पूर्णपणे बरी आहे.. कारण मी कधीही ग्लॅमर आणि टाळ्यांच्या क्षणिक उधारीवर जगले नाही. मी एक तळपता सूर्य आहे. मध्यस्थ असणारी आणि स्वतःमध्ये रमलेली.”
यासंबंधी तिने ट्विट सुद्धा केलं आहे आहे. “हीच समस्या आहे की स्त्रियांना गोल्ड डिगर संबोधलं जातं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये ती लिहिते, “अचानक माजी मिस युनिव्हर्सचं खाजगी आयुष्य आणि डेटिंग लाईफ वादविवादाचा विषय बनतं.” या ट्विट्समधून तिला गोल्ड डिगर म्हणणाऱ्याची बोलती तिने बंद केली आहे.
The Problematic Culture Of Calling Women Gold Diggers
— sushmita sen (@thesushmitasen) July 17, 2022
https://t.co/zmQ1A8EIup via @SheThePeople 👏❤️🤗 #ASelfMadeWoman 👍
सुष्मिताने यामध्ये एका वेबसाईटला टॅग करत हे ट्विट केलं आहे. तिच्या नात्यावर वेगवेगळ्या शंका घेऊन तिला ट्रोल करणाऱ्यांना करारं उत्तर तिने दिलं आहे. हे ही वाचा- Lalit Modi Sushmita Sen: सुष्मितासोबतच्या नात्यावर ‘फरार’ म्हणून गॉसिप करणाऱ्यांना ललित यांचं थेट उत्तर, म्हणाले… सुष्मितावरून होणाऱ्या चर्चांवर ललित यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपलं मत ठामपणे मांडल्याचं दिसून आलं. ललित मोदींना ट्रोल करण्याबद्दल नाराजी व्यक्त करत इन्स्टाग्राम वरील पोस्टमध्ये ते लिहितात, “मीडियाला मला ट्रोल करायला का आवडतं? मला अत्यंत चुकीच्या पद्धतीने टॅग केलं जात आहे. मला वाटत आपण आजही मध्ययुगात जगत आहोत जिथे आजही असा समज नाही दोन व्यक्ती एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात आणि जर दोघांमध्ये केमिस्ट्री बरोबर असेल तर योग्य वेळी जादू होऊ शकते. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जागा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या.”