मुंबई 17 जुलै: ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपच्या बातमीने सगळीकडेच खळबळ माजवली होती. स्वतः ललित मोदी यानी ट्विट करून याबद्दल माहिती दिल्यावर सुष्मिता आणि ललित यांच्याबद्दल बऱ्याच बातम्या जोर धरताना दिसत होत्या. दोघांच्याही पर्सनल आयुष्याबद्दल सुद्धा बरीच चर्चा चाहत्यांमध्ये होत होती.मात्र या सगळ्या गॉसिप आणि चर्चांवर ललित मोदी यांनी एक (lalit modi reaction) लांबलचक पोस्ट शेअर करून आपलं मत मांडलं आहे. काय म्हणाले ललित मोदी? ललित मोदींना ट्रोल करण्याबद्दल नाराजी व्यक्त करत इन्स्टाग्राम वरील पोस्टमध्ये ते लिहितात, “मीडियाला मला ट्रोल करायला का आवडतं? मला अत्यंत चुकीच्या पद्धतीने टॅग केलं जात आहे. मला वाटत आपण आजही मध्ययुगात जगत आहोत जिथे आजही असा समज नाही दोन व्यक्ती एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात आणि जर दोघांमध्ये केमिस्ट्री बरोबर असेल तर योग्य वेळी जादू होऊ शकते. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जागा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या.” “डोनाल्ड ट्रम्प सारख्या खोट्या बातम्या लिहू नका तर सत्य बातम्या लिहा. जर तुम्हाला माहित नसेल तर सांगू इच्छितो की मीनल मोदी विवाहित असताना माझी बारा वर्ष जुनी चांगली मैत्रीण होती. ती माझ्या आईची मैत्रीण नव्हती. हे निव्वळ स्वार्थी मानसिकतेतून पसरवलेलं गॉसिप आहे. अशा छोट्या विचारसणीतून बाहेर यायची वेळ आली आहे. एखाद्याची भरभराट होत असेल तर त्यात सहभागी व्हा, आनंदी व्हा.” हे ही वाचा- Lalit Modi Sushmita Sen: खासगीतल्या फोटोंनंतर आता ललित सुष्मिताचे प्रायव्हेट चॅटही VIRAL; काय आहे सुष्मिताची प्रतिक्रिया? त्यांना फरारी म्हणणाऱ्यांवर सुद्धा निशाणा साधत ते लिहितात, “तुम्ही मला फरारी म्हणता पण कोणत्या कोर्टाने मला कधी दोषी ठरवलं याचं उत्तर द्या. मी तुम्हाला सांगतो मला कोणीच दोषी ठरवलेलं नाही. मी सगळ्यांपेक्षा अधिक ताठ मानेने जगत आहे.”
ललित यांनी या पोस्टमध्ये अनेक बाबींचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल चालू असणाऱ्या चर्चांवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ललित यांच्या प्रेमाच्या कबुलीनंतर त्यांनी इन्स्टाग्राम bio मध्ये सुद्धा सुष्मिताच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसंच आपल्या या नात्याबद्दल ते दिलखुलासपणे मत मांडताना दिसून आले आहेत.