Home /News /entertainment /

बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत, आईनं केला मोठा खुलासा

बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत, आईनं केला मोठा खुलासा

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीच्या आईनं तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

  मुंबई, 19 मे : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा सध्या खूप चर्चेत आहे. नेहमीच बोल्ड आणि अपीलिंग ड्रेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल होणाऱ्या नुसरतनं नुकताच तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊनमुळे नुसरत सध्या तिच्या घरीच आहे. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती खूप चर्चेत आली आहे. ज्यात तिच्या आईनेच तिच्या लग्नाबाबत हिंट दिली आहे. नुसरत भरूचा आणि तिच्या आईनं काही दिवासांपूर्वी पिंकव्हिलाला एक मुलाखत दिली. यावेळी नुसरतनं तिच्या 'सोनू के टीटू की स्विटी' सिनेमातील छोटे छोटे पेग या गाण्याबाबत एक किस्सा शेअर केला. ती म्हणाली, मी या गाण्याविषयी माझ्या घरी सांगितलं नव्हतं. कारण या गाण्यामुळे मला कोणता प्रॉब्लेम नको होता. मी ठरवलं की शूटिंग संपल्यावर मी माझ्या घरच्यांना सांगेन. पण मग गाणं रिलीज झालं तरीही मी त्यांना काहीच सांगितलं नाही. ऋषी कपूर यांच्या आठवणीत पुन्हा भावुक झाल्या नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या...
  नुसरत पुढे म्हणाली, एक दिवस मी सिनेमाचं प्रमोशन संपवून थोडी उशिरा घरी पोहोचले. त्यावेळी मी माझ्या आई-बाबांना माझं गाणं बघत असताना पाहिल. मला थोडी भीती वाटली की बाबा काय बोलतील आता माझं काही खरं नाही. त्यांनी मला विचारलं बेटा ही ब्रा आहे का? त्यावर मी उत्तर दिलं, नाही बाबा ब्रालेट आहे दोघांमध्ये फरक आहे. सुदैवानं यावरुन घरात काहीच वाद झाला नाही.
  या मुलखातीत नुसरतच्या आईनं मात्र तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला. त्या म्हणाल्या, लवकरच नुसरत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कारण ती अद्याप सेटल झालेली नाही त्यामुळे आम्हाला तिची खूप चिंता आहे. तिला हवा तेवढा वेळ आम्ही दिला आहे. पण आता आम्ही आणखी वेळ देऊ शकत नाही. नुसरतच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच छलांग या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत 'हुडदंग' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. आर्थिक तंगीमुळे अभिनेत्यावर आली फळं विकायची वेळ, आयुष्मानसोबत केलं आहे काम स्टनिंग फोटोंमुळे चर्चेत आहे मराठीमोळी स्टारकिड, वडिलांनी गाजवली सिनेसृष्टी
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या