जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Lalit Modi Health : सुष्मितासोबत नाव जोडलेले ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर, 2 आठवड्यात 2 वेळा कोरोना

Lalit Modi Health : सुष्मितासोबत नाव जोडलेले ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर, 2 आठवड्यात 2 वेळा कोरोना

ललित मोदी, सुष्मिता सेन

ललित मोदी, सुष्मिता सेन

आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक ललित मोदी कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जानेवारी : आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक ललित मोदी कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतेच ललित मोदी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या रिलेशनशिपमुळे चांगलेच चर्चेत आले होते. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच ललित मोदींची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. ललित मोदी आठवडाभरापासून 24 तास ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. ललित मोदींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ललित मोदींनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शुक्रवारी पोस्ट शेअर करत सांगितले की, ‘डॉक्टर आणि मुलगा कुशल यांनी मला एअर अॅम्ब्युलन्सने लंडनला आणले आणि माझ्यावर उपचार केले, त्यामुळे मी मृत्यूतून परत येऊ शकलो, परंतु तरीही मला 24 तास ऑक्सिजन सपोर्टवर राहावे लागणार आहे.’ ललित मोदी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आले आहेत. त्याला इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया या दोन आठवड्यात दोनदा कोविड झाला होता. हेही वाचा -  शरद पवार यांनाही ‘त्या’ प्रकरणात प्रतिवादी करा; केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती ललित मोदी म्हणाले, दोन डॉक्टरांनी माझ्यावर तीन आठवडे उपचार केले आणि सतत माझे निरीक्षण केले. एका डॉक्टरने मेक्सिको सिटीमध्ये माझी काळजी घेतली आणि दुसर्‍याने लंडनमध्ये माझी काळजी घेतली. त्यांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांनी पुढे लिहिले की फ्लाइट आरामदायक होती. विस्तारा जेटचेही आभार. मी सर्वांचा खूप आभारी आहे. सर्वांवर प्रेम. माझा मुलगा, मित्र आणि माझा जवळचा मित्र हरीश साळवे, जो दोन आठवडे पूर्णपणे माझ्यासोबत होता. ते सर्व माझे कुटुंब आणि माझा एक भाग आहेत.

जाहिरात

दरम्यान, ललित मोदींनी आयपीएलची सुरुवात केली होती. ते 2005 ते 2010 पर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. 2008 ते 2010 या काळात ते आयपीएलचे अध्यक्ष आणि आयुक्त होते. 2010 मध्ये ललितला हेराफेरीच्या आरोपावरून आयपीएलच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांना बीसीसीआयमधूनही काढून टाकण्यात आले. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप झाल्यानंतर ललित 2010 मध्ये देश सोडून पळून गेले होते.

News18लोकमत
News18लोकमत

गेल्या वर्षी ललित मोदी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतचे नाते जाहीर केले. 14 जुलै 2022 रोजी ललित मोदी यांनी इंस्टाग्राम पोस्टवरच सुष्मिता सेनसोबतच्या नात्याचा खुलासा करताना दोघांचे अनेक फोटो पोस्ट केले होते. मात्र, सुष्मिता सेनेने आयपीएलच्या संस्थापकासोबत डेटिंग करण्याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही. काही दिवसानंतर ललित मोदींनी त्यांच्या बायोमधून सुष्मिता सेनचे नाव देखील काढून टाकले, ज्यामुळे दोघांनी ब्रेकअप केल्याच्या चर्चा रंगल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात