जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / IPL सोडा ललित मोदी यांचे बाकीचे कारनामे वाचा; तुम्ही म्हणाल हा माणूस आहे की उद्योगी?

IPL सोडा ललित मोदी यांचे बाकीचे कारनामे वाचा; तुम्ही म्हणाल हा माणूस आहे की उद्योगी?

IPL सोडा ललित मोदी यांचे बाकीचे कारनामे वाचा; तुम्ही म्हणाल हा माणूस आहे की उद्योगी?

मोदी बिझनेस हाऊसशी संबंधित असलेले ललित मोदी सामान्यतः देशातील सुपरहिट आयपीएलसाठी ओळखले जातात. मात्र, हा एकच प्रयोग मोदींचा यशस्वी झाला. याअगोदर मोदींनी अनेक उद्योग केले. अजूनही राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै : गुरुवारी एका ट्विटने देशभरात खळबळ उडवून दिली. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. मात्र, ललित मोदी यांनी दिलेला हा काही पहिला धक्का नव्हता. सुपरहिट आयपीएल क्रिकेट लीगची सुरुवात करणाऱ्या ललित मोदींची कहाणी कांद्याच्या सालीप्रमाणे आहे, त्याचे जेवढे पदर उघडले जातील, तेवढ्या नव्या गोष्टी समोर येतात. यावेळी त्यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याबद्दलही चाहत्यांवर बॉम्ब टाकला आहे. मात्र, ललित मोदी विचार केल्याशिवाय काहीही करत नाहीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या नात्याबाबत ट्विटरवर जो गौप्यस्फोट केला, त्यामागेही मोठे कारण असावे. ललित मोदींना लहानपणापासून ओळखणारे सांगतात, की ते कधीच सरळ मार्गावर चालले नाहीत. कारण, पुढे जाण्यासाठी सरळ मार्ग कधीच नसतो असे त्यांना वाटत होते. पैसा, राजकारण आणि अनैतिक आचरणांच्या मिश्रणाचे यशस्वी सूत्र त्यांनी लहानपणापासून पाहिले आणि समजून घेतले असावे. त्यामुळे त्यांनी आपला मार्ग शोधला, जो वादांनी भरलेला होता. ललित मोदी आणि वाद हे कायम सोबतच राहिले आहे. ललित हे देशातील प्रसिद्ध उद्योग घराण्याच्या वारसांपैकी असेल तरी पडद्यामागील राजकीय लोकांशी त्यांचे संपर्क अजूनही घट्ट असल्याचे बोलले जाते. एकेकाळी ते शरद पवार यांचे खास व्यक्ती होते. तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांच्याशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. अनेक व्यवसायांत अपयश वादांमुळे ललित मोदींचे सर्व व्यवसाय एकतर अपयशी ठरले किंवा वादांच्या भोवऱ्यात बंद पडले. ललित यांच्याकडे सध्या दोन मोठ्या कंपन्या आहेत, ज्या त्यांना कुटुंबाकडून वारशाने मिळाल्या आहेत, एक सिगारेट निर्माता गॅडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड आणि दुसरी इंडीओफिल ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. न्यूयॉर्कच्या पेस युनिव्हर्सिटीमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधील पदवीधर असलेले मोदी यांचा एकमेव यशस्वी उपक्रम म्हणजे आयपीएल, अन्यथा व्यवसाय सुरू करणे आणि बंद करण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. ईएसपीएन भारतात आणलं 1994 मध्ये, जेव्हा देशात केबल टीव्ही सुरू होत होते, तेव्हा मोदींनी पाच वर्षांच्या करारावर ESPN भारतात आणले. केबल ऑपरेटरकडून पैसे गोळा करणे ही त्यांची मुख्य भूमिका होती, ज्यामुळे नंतर त्यांच्या आणि ईएसपीएनमध्ये मोठा वाद झाला. नंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले. 1997 मध्ये, ईएसपीएनने स्वतःचं वितरण टीम स्थापन केली. Lalit Modi First wife: आईच्या मैत्रिणीशीच केलं होतं लग्न, सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरने पुन्हा वादात अडकला IPL Founder फॅशन टीव्हीसोबत करार यानंतर मोदींनी केके मोदी ग्रुप अंतर्गत मोदी एंटरटेनमेंट नेटवर्क नावाची नवीन कंपनी उभारली. ही कंपनी वॉल्ट डिस्ने यांच्या संयुक्त विद्यमाने उघडण्यात आली. पुढे सरकारने डिस्नेला देशात स्वतःचे चॅनल सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्यावर दोघांचा दहा वर्षांचा करार आपोआपच मोडीत निघाला. नंतर मोदी एंटरटेनमेंटने फॅशन टीव्हीशी करार केला, पण दोघांमध्ये वाद व्हायला वेळ लागला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. अखेरीस FTV भारतातील ऑपरेशनमधून बाहेर पडले. त्यानंतर फॅशन टीव्हीचे नियंत्रण मोदी एंटरटेनमेंटकडे गेले. ऑनलाइन जुगाराशीही मोदींचं नाव भारतातील ऑनलाइन जुगार आणि लॉटरी उद्योगांशीही मोदींचे नाव जोडले गेले आहे. 2002 मध्ये जेव्हा सरकारने ऑनलाइन जुगार उद्योगांना ग्रीन सिग्नल दिला तेव्हा केके मोदी ग्रुप हा या व्यवसायात प्रवेश करणारा पहिला ग्रुप होता. 2002 मध्ये मोदींनी केरळमध्ये ऑनलाइन लॉटरी सुरू केली. पण प्रतिस्पर्धी कंपनी प्लेविनने न्यायालयात जाऊन मोदींच्या लॉटरीला स्थगिती मिळवली. मोदींनी हार मानली नाही आणि एक वर्षानंतर त्यांनी पुन्हा केरळमध्ये सनसाइन या ब्रँड नावाने ऑनलाइन लॉटरी व्यवसायात प्रवेश केला. नंतर केरळ सरकारने 2004 मध्ये त्यावर बंदी घातली. नंतर या व्यवसायात अनेकांनी मोदींवर फसवणुकीचे आरोप करत, पैसे हडप केल्याचा आरोप केला. किंबहुना, त्यांनी केरळमधील 100 लोकांना पाच लाख रुपयांमध्ये फ्रँचायझी दिली, ज्यामध्ये कोणालाही त्यांचे पैसे परत मिळू शकले नाहीत. राजस्थानमध्येही रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर मोदींनी अंबर हेरिटेज सिटी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला, जो नंतर आनंद हेरिटेज हॉटेल्समध्ये बदलला गेला. राजस्थानातील अनेक हेरिटेज स्थळे घेतल्याने ही कंपनी वादात सापडली. हे सर्व सौदे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया असताना झाले होते. मात्र, आता अंमलबजावणी संचालनालय हेरिटेज हॉटेलमध्ये फेमाच्या नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. Sushmita Sen: ललित मोदींना डेट करणारी सुष्मिता सेन आहे इतक्या कोटींची मालकीण;आकडा जाणून व्हाल थक्क आधी हिमाचल क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रवेश मग राजस्थान भारतीय क्रिकेट नियामक मंडळात प्रवेश करण्यासाठीही त्यांनी विचारपूर्वक रणनीती तयार केल्याचे दिसते. 1999 मध्ये, ते पहिल्यांदा हिमाचल क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाले, ज्याकडे स्वतःचे कोणतेही क्रिकेट मैदान नव्हते. त्यानंतर पुढच्याच वर्षी मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राजस्थानकडे प्रयाण केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पाठिंब्याने त्यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन गाठले. वादग्रस्त निवडून आलेले अध्यक्ष, अशी चर्चा त्यावेळी झाली. बीसीसीआयमध्ये शरद पवारांच्या विजयासाठी रणनिती तेव्हा जगमोहन दालमिया यांचा भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा होता. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या विजयाच्या सर्व रणनिती पडद्यामागे खेळणारे ललित हेच होते, असे म्हटले जाते. त्यानंतर मोदी पवारांचे खास झाले होते. त्यांना बीसीसीआयमध्ये उपाध्यक्ष करण्यात आले. केवळ सहा वर्षात बीसीसीआयमध्ये एवढा मोठा प्रवास दुर्मिळ व्यक्तीच करू शकतो. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये त्यांच्या शब्दाला महत्त्व आलं लोकांना आपलसं करणे आणि कमी वेळात यशाचं शिखर गाठल्याने त्यांनी मित्रांसोबत शत्रूही निर्माण झाले. हा असा काळ होता जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये त्यांच्या शब्दाला महत्त्व होतं. असे मानले जाते की या काळात त्यांनी बीसीसीआयला असे मंत्र दिले की त्यांची कमाई अनेक पटींनी वाढली. दीड-दोन वर्षांच्या मेहनतीनंतर जेव्हा त्यांनी इंडियन प्रीमियर लीग सुरू केली तेव्हा त्यांना पर्याय नव्हता. यशाची शिखरे गाठल्यानंतर ते तितक्याच वेगाने खाली आले. थरूर यांच्याशी वाद त्यांनी आयपीएलसाठी मॉरिशस कंपनी वर्ल्ड स्पोर्ट्सला आयपीएलचे 425 कोटींचे कंत्राट दिले होते, ज्यामध्ये त्यांच्यावर 125 कोटी कमिशन घेतल्याचा आरोप होता. एवढेच नाही तर ललित मोदींवर दोन नवीन संघांच्या लिलावादरम्यान चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात आला होता. कोची संघाचा लिलाव आणि प्रवर्तकांची माहिती ट्विटरवर शेअर करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यामध्ये एकीकडे शशी थरूर यांना यूपीए सरकारचा राजीनामा द्यावा लागला, तर उलटपक्षी ललित मोदींचेही दिवस फिरले. आता यूकेमध्ये ऐषोआरामाचे जीवन 2010 मध्येच आयपीएलनंतर ललित मोदी यांना आयपीएल कमिशनर पदावरून निलंबित करण्यात आले होते. गडबडीचा आरोप झाल्यानंतर ललित मोदी ब्रिटनला गेले होते, तेव्हापासून ते तिथेच राहत आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते लंडनमधील एका अत्यंत महागड्या जागेत आलिशान जीवन जगत आहे. तेथून ते त्यांचा व्यवसाय सांभाळतात. अंमलबजावणी संचालनालयाने मोदींविरोधात नोटीस जारी केली आहे. अनेकवेळा त्यांना अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. पण, ते कधीच भारतात आले नाही. यामागे त्यांचा नेहमी एकच तर्क असतो की भारतात अंडरवर्ल्डपासून आपल्या जीवाला धोका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात