मुंबई 15 जुलै: उद्योगपती ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन च्या रिलेशनशिपच्या (Lalit Modi and Sushmita Sen dating) बातमीने सध्या चांगलाच जोर पकडला आहे. ललित मोदी यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली आहे. या डेटिंगच्या बातमीवर सुष्मिताची पहिली प्रतिक्रिया (Sushmita Sen first reaction on dating Lalit Modi) समोर येताना दिसत आहे. काय म्हणाली सुष्मिता? सुष्मिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल स्वतःच मत व्यक्त केलं आहे. यामध्ये ती लिहिते, “मी एका आनंदी स्थितीत आहे. ना लग्न झालंय ना रिंग आहे. माझ्या आजूबाजूला केवळ निरपेक्ष प्रेम आहे. खूप झालं स्पष्टीकरण आता कामाला लागावं. माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल खूप आभार. आणि जे नाही झाले त्यांच्याबद्दल घेणं देणं नाही. I love you guys” सुष्मिता आणि ललित यांच्या रिलेशनशिपच्या बातमीनंतर त्यांच्या नात्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यांच्यातील वयाचं अंतर, ललित यांचं खाजगी आयुष्य, सुष्मिताचे आधीचे बॉयफ्रेंड अशा अनेक विषयांवर चर्चा होताना दिसत आहे. त्यांच्यातील एक जुनं ट्विट सुद्धा बरंच viral होताना दिसत आहे. या ट्विटमुळेच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली असं सांगितलं जात आहे.
डेटिंगच्या घोषणेनंतर ललित यांनी आपली इन्स्टाग्राम bio बदलून त्यात सुष्मिताच्या नावाचा उल्लेख केला आहे. “अखेर माझ्या partner in crime सोबत आयुष्याची सुरुवात करत आहे. My love सुष्मिता सेन” असं त्यांनी या bio मध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या कृतीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांच्या या प्रेमाला कोणी क्युट म्हणत आहे तर काही चाहत्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहे. हे ही वाचा- Lalit Modi Sushmita Sen: खासगीतल्या फोटोंनंतर आता ललित सुष्मिताचे प्रायव्हेट चॅटही VIRAL; काय आहे सुष्मिताची प्रतिक्रिया? आपल्या डेटिंग लाईफबद्दल ललित यांनी बरेच डिटेल्स शेअर केल्याचं दिसून येत असताना सुष्मिता मात्र याबद्दल आपलं मौन बाळगून ठेवताना दिसून आली होती. तिने कोणतेही फोटो शेअर केले नव्हते तसंच याबद्दल कोणत्याच सोशल मीडियावर ती काहीच रिऍक्ट झालेली नव्हती. तिची इन्स्टाग्राम bio सुद्धा I AM ❤️ अशीच होती. तिने bio मध्ये बदल केलेला नाही. सुष्मिताची खाजगी आयुष्यातील अपडेटवर काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले होते. आता तिच्या या प्रतिक्रियेनंतर कोणत्या नव्या चर्चाना उधाण येतं हे पाहावं लागेल. डेटिंगच्या घोषणेनंतर सध्या ललित आणि सुष्मिता यांचे vacation फोटो viral होताना दिसत आहेत.