मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Lalit Modi Sushmita Sen: खासगीतल्या फोटोंनंतर आता ललित सुष्मिताचे प्रायव्हेट चॅटही VIRAL; काय आहे सुष्मिताची प्रतिक्रिया?

Lalit Modi Sushmita Sen: खासगीतल्या फोटोंनंतर आता ललित सुष्मिताचे प्रायव्हेट चॅटही VIRAL; काय आहे सुष्मिताची प्रतिक्रिया?

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या अफेअरची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अजून जरी या कपलने लग्नगाठ बांधली नसली तरी त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. सध्या ललित यांच्या एका जुन्या ट्विटची खूप चर्चा होत आहे.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 15 जुलै: IPL फाउंडर ललित मोदी आणि मिस युनिव्हर्स राहिलेली सुष्मिता सेन यांच्या अफेअरच्या बातमीनंतर (Lalit Modi and Sushmita Sen dating) आता अजून एक मोठी माहिती समोर येत आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनला डेट करत असल्याची माहिती दिल्यावर काहीच वेळात त्यांच्या एका जुन्या ट्विटची बरीच चर्चा होताना दिसत आहे. 2013 मध्ये ललित यांनी सुष्मिताला मेन्शन करून ‘मला उत्तर दे’ असं ट्विट केलं होतं.

काय आहे ललित यांचं ट्विट?

IPL चे फाउंडर उद्योगपती ललित मोदी आपल्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले होते. त्यांचं सुष्मिता यांच्याशी बराच काळापासून अफेअर चालू होतं अशा बातम्या सध्या जोर धरताना दिसत आहे. याचं कारण त्यांनी नऊ वर्षांपूर्वी केलेलं ट्विट. ललित यांनी 2013 मध्ये केलेल्या एका ट्विटमध्ये सुष्मिता सेनला टॅग करत कमिटमेंट, नातं आणि वचनं याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावर सुष्मिताने gotcha 47 :) असा रिप्लाय केला होता. त्यावर तिला मेन्शन करून ‘माझ्या SMS ला उत्तर दे’ असं ललित मोदी यांनी ट्विट केलं होतं. त्यांच्या अफेअरच्या बातमीनंतर या ट्विटची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसंच ललित मोदी आणि सुष्मिताच्या प्रेमकहाणीची सुरुवात सुद्धा या ट्विटनंतर झाली असावी असं सुद्धा सांगण्यात येत आहे.

ललित मोदींनी बदलली इन्स्टाग्राम bio

या डेटिंगच्या घोषणेनंतर काहीच वेळात ललित यांनी आपली इन्स्टाग्राम bio बदलून त्यात सुष्मिताच्या नावाचा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा- Lalit Modi First wife: आईच्या मैत्रिणीशीच केलं होतं लग्न, सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरने पुन्हा वादात अडकला IPL Founder

“अखेर माझ्या partner in crime सोबत आयुष्याची सुरुवात करत आहे. My love सुष्मिता सेन” असं त्यांनी या bio मध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या कृतीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सुष्मिता सेनची काय आहे प्रतिक्रिया?

आपल्या डेटिंग लाईफबद्दल ललित यांनी बरेचडिटेल्स शेअर केल्याचं दिसून येत असताना सुष्मिता मात्र याबद्दल आपलं मौन बाळगून ठेवताना दिसत आहे. तिने कोणतेही फोटो शेअर केले नाहीत तसंच याबद्दल कोणत्याच सोशल मीडियावर ती काहीच रिऍक्ट झालेली नाही. तिची इन्स्टाग्राम bio सुद्धा I AM ❤️ अशीच आहे. सुष्मिताची या खाजगी आयुष्यातील अपडेटवर काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. सध्या ललित आणि सुष्मिता यांचे vacation फोटो viral होताना दिसत आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Relationship, Sushmita sen wedding, Tweet, Twiter