मुंबई, 03 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन पुन्हा एकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या लव्ह-हेट रिलेशनशिपने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी संपताना दिसत नाहीत. चारूने राजीवपासून घटस्फोट जाहीर केला असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. यावेळी गोष्टी इतक्या पुढे गेल्या की चारू असोपा आणि राजीव सेन यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता राजीवनही चारूवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
चारूने राजीववर मारहाण, शिवीगाळ आणि संशय घेण्याचा आरोप केला. राजीवला दुसरी संधी दिल्याचा पश्चाताप होत असल्याचेही चारूने सांगितले होते. आता राजीव सेनने एक व्हिडीओ शेअर करत चारुवर गंभीर आरोप केले आहेत. राजीव सेन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने चारू आणि त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा आहे.
हेही वाचा - Manoj Bajpayee: अभिनेते मनोज बाजपेयी अंबाबाईच्या चरणी; कोल्हापुरातील प्रसिद्ध मंदिरात केलं ध्यान
काय म्हणाला राजीव?
या व्हिडिओमध्ये राजीव म्हणाला कि, ''मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओंचे व्ह्यूज वाढवण्यासाठी चारू आणि जियानाच्या नावाचा वापर करतोय, असा केलेला तिनं आरोप हा तिचा बालिशपणा आहे. सकाळी उठल्यानंतर ती माझ्यावर आज काय आरोप करायचे, याचाच विचार करत असावी. चारू म्हणते की, मी तिला सोडून निघून जातो, म्हणून तिला घटस्फोट हवाय, हे काय कारण असू शकत नाही. एकदा तर ती देखील रात्री २ वाजता ती मला सोडून गेली होती. मग मी काय सांगत सुटलो का की, माझी बायको मला सोडून गेली म्हणून. या कारणांसाठी कोण वेगळं होत नाही.''
पुढे तो म्हणाला कि, ''मी कठीण काळातून जात आहे. माझ्यासोबत माझी मुलगी नाही. चारू आणि मी वेगळे होत आहोत. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्याही झाल्या आहेत. आमची मुलगी जियाना हिच्यासाठी आम्ही दोघांनी नेहमी हजर राहावं अशी माझी इच्छा आहे.'' तसंच, राजीव पुढं म्हणाला की, चारूला युट्यूबचं व्यसन लागलं आहे. व्हिडिओंसाठी ती जियालाना घेऊन इकडे तिकडे फिरत असते. मी तिला म्हणालो होतो, की, जियानाला न घेता व्लॉग बनवता जा, मग पाहू किती व्ह्यूज येतात. पण तिलाही माहीत आहे की, जे व्ह्यूज येतात ते जियानामुळं येतात.असंही तो म्हणाला आहे.
चारू असोपाने 2019 मध्ये राजीव सेनसोबत दुसरे लग्न केले होते. 2022 मध्ये राजीव सेन यांनी आरोप केला होता की चारूने त्यांच्या पहिल्या लग्नाची बाब लपवली होती. जुलै 2022 पासून दोघांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या. आता दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood actress, Sushmita sen wedding