जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ती ड्रामा क्वीन'; चारुने घटस्फोट जाहीर करताच राजीव सेनची प्रतिक्रिया

'ती ड्रामा क्वीन'; चारुने घटस्फोट जाहीर करताच राजीव सेनची प्रतिक्रिया

चारु असोपा, राजीव सेन

चारु असोपा, राजीव सेन

सुष्मिता सेनचा मेव्हणा राजीव सेन पुन्हा एकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या लव्ह-हेट रिलेशनशिपने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑक्टोबर : सुष्मिता सेनचा मेव्हणा राजीव सेन पुन्हा एकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या लव्ह-हेट रिलेशनशिपने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी संपताना दिसत नाहीत. पुन्हा चारूने राजीवपासून घटस्फोट जाहीर केला असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. यावेळी गोष्टी इतक्या पुढे गेल्या की चारू असोपा आणि राजीव सेन यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता राजीवनही चारूच्या आरोपांवर मौन सोडले आहे. चारूने राजीववर मारहाण, शिवीगाळ आणि संशय घेण्याचा आरोप केला. राजीवला दुसरी संधी दिल्याचा पश्चाताप होत असल्याचेही चारूने सांगितले.  टाइम्स नाऊ डिजिटलशी झालेल्या संवादात राजीव यांनी चारूच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. राजीव म्हणाला- म्हणूनच मी तिला ड्रामा क्वीन म्हणतो. पहिली गोष्ट जर तिला घटस्फोट घ्यायचा असेल तर ती मला आणि माझ्या कुटुंबाला थेट कॉल करू शकते. पण यासाठी मीडियाला बोलवायची काय गरज होती. हेही वाचा  -  ‘मला शिवीगाळ केली, मारहाण केली’; अखेर चारु राजीव सेनपासून घटस्फोट घेणार राजीव पुढे म्हणाला, माझ्यावर खोटे आरोप केले आहेत की मी तिला सोडून गेल्यानंतर अनेक महिने गायब होतो, मी तिला शिवीगाळ केली, मी मारहाण केली. पण मी मीडियाला कधीच काही बोललो नाही. आरोपांना उत्तर देताना मी नेहमीच माझा बचाव केला आहे. आता मला माझ्या मुलीच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे, कारण ती तिच्यासोबत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

माझ्या मुलीच्या सुरक्षेसाठी मी आवश्यक ती कारवाई करेन. YouTube व्हिडिओ आणि माध्यमांद्वारे आमचे जीवन बऱ्याच काळापासून सार्वजनिक आहे. काय चालले आहे, कोण चूक आणि कोण बरोबर हे लोकांना समजते. चारू आणि तिच्या कुटुंबाबद्दलही मी खूप काही सांगू शकतो. पण तरीही मला त्यांना आदर द्यायचा आहे, असंही राजीव म्हणाला. आता यावर चारु काय प्रतिक्रिया देईन हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात