मुंबई, 12 जुलै : सुशांतसिंग राजपूत यांच्या अकाली मृत्यूचा अद्यापही त्यांच्या चाहत्यांनी स्वीकार केलेला नाही. त्याचे चाहते आजगी त्याला विसरण्यास तयार नाहीत. तो आत्महत्या करू शकत नाही असा त्यांच्या चाहत्यांचा विश्वास आहे. सुशांतसिंग राजपूत यांना नैराश्याच्या 2 आजारांवर उपचार घेत होता, अशी बातमी एका पोलीस अधिकाऱ्याने उद्धृत केलेल्या एका मीडिया हाऊसने प्रसारित केली आहे. लॉकडाऊनच्या आठवडाभरापूर्वीच त्याला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठीही दाखल केले होते. वांद्रे पोलीस 14 जूनपासून त्याच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 25 ते 30 जणांची चौकशी केली आहे. सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी त्याच्या वांद्रे, मुंबई येथील अपार्टमेंटमध्ये सापडला होता, पण बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि सुशांतचे चाहते त्याच्या आत्महत्येच्या मागे कारस्थान असल्याची शंका व्यक्त करीत आहेत. . सुशांतला या 2 आजारांनी ग्रासले होते एनबीटीने यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कुणालाही कोणत्याही प्रकारचा कट रचल्याचा पुरावा मिळालेला नाही. ही घटना आत्महत्येची आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे. या अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, सुशांत डिप्रेशनचे भयावह आजार पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डरने ग्रस्त होता. हे वाचा- अभिषेकची नवी वेब सीरिज ‘ब्रीद..‘मधील सहकलाकारही करणार कोरोना टेस्ट तपासानुसार सुशांतची आईदेखील डिप्रेशनने पीडित होत्या. सुशांत 16 वर्षांचा असताना त्याच्या आईचं देहावसान झालं. बॉलिवूडमध्ये कामात व्यस्त असतानाही सुशांतला एकटं वाटायचं, असं त्याच्या सहकलाकारांशी केलेल्या चौकशीतून पुढे आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.