Home /News /entertainment /

अभिषेकची नवी वेब सीरिज 'ब्रीद..'मधील सहकलाकारही करणार कोरोना टेस्ट

अभिषेकची नवी वेब सीरिज 'ब्रीद..'मधील सहकलाकारही करणार कोरोना टेस्ट

बिग बींगसह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे

  मुंबई, 12 मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय अभिनेता अनुपम खेर यांच्याही घरातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे आणि त्यासोबतच लवकरच कोरोना टेस्ट होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
  View this post on Instagram

  🙏🏻🙏🏻

  A post shared by AMIT SADH (@theamitsadh) on

  अमित साध याने अभिषेक बच्चनसोबत नुकतीच रिलीज झालेली वेब सीरिज 'ब्रीथ: इन शेडोज' मध्ये सह-कलाकाराचे काम केले आहे. अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित साधची कोरोना टेस्ट होणार आहे. सोशल मीडियातील बर्‍याच लोकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा झटका बसला आहे. बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही पिता-पुत्रांना मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. बच्चन कुटूंब, अनुपम खेर आणि रेखा यांच्या बंगल्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बीएमसीने तिन्ही सेलिब्रिटींचे बंगले सॅनिटाईज केले आहे. त्यांच्या प्रत्येक स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. काही वेळा तर हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी येऊ देत नाही. सोसायटीतील लोक स्वत:चे नियम बनवतात, याबाबत चौकशी करण्यात येईल, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Corona

  पुढील बातम्या