Home /News /entertainment /

Sushant Singh Rajput Birth Anniversary: सुशांत सिंह राजपूतच्या 'या' गोष्टीने थक्क झाला होता धोनी

Sushant Singh Rajput Birth Anniversary: सुशांत सिंह राजपूतच्या 'या' गोष्टीने थक्क झाला होता धोनी

आज सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस (Sushant Singh Rajput Birth Anniversary) आहे. त्यानिमित्ताने आपण सुशांत आणि महेंद्रसिंह धोनीचा एक खास किस्सा पाहणार आहोत.

    मुंबई,21 जानेवारी-   अभिनेता सुशांत सिंह राजपूतने   (Sushant Singh Rajput)  छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करत बॉलिवूडचा  (Bollywood)  पल्ला गाठला होता. अभिनेत्याने फारच कमी वेळेत सर्वांनाच थक्क करणारं यश मिळवलं होतं. साधा स्वभाव आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सुशांतने फक्त लोकप्रियतेचं मिळवली नाही तर प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत. परंतु सुशांतने अचानक सर्वकाही मागे सोडत जगाचा निरोप घेतला होता. त्याचं जाणं आजही कोणाला मान्य नाही. आजही तो त्याच्या चाहत्यांमध्ये जिवंत आहे. आज सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस  (Sushant Singh Rajput Birth Anniversary)  आहे. त्यानिमित्ताने आपण सुशांत आणि महेंद्रसिंह धोनीचा एक खास किस्सा पाहणार आहोत. हा किस्सा त्यावेळचा आहे जेव्हा सुशांत 'एमएस धोनी' चित्रपटाची तयारी करत होता. या काळात सुशांतच्या प्रश्नांना धोनी अक्षरशः वैतागला होता. याबद्दल सांगताना धोनीने म्हटलं होतं, या चित्रपटाची जेव्हा तयारी सुरु होती. तेव्हा सुशांत धोनीला भेटायला गेला होता. चित्रपटाआधी तब्बल तीन वेळ धोनी आणि सुशांत यांची भेट झाली होती. सुशांत जेव्हा धोनीला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो फारच शांत होता. त्याला जे सांगितलं जात आहे, ते तो शांतपणे ऐकत होता. परंतु नंतर ज्या दोन मुलाखती झाल्या, त्यावेळी सुशांतने धोनीला एकापाठोपाठ एक प्रश्न विचारून अक्षरशः भांडावून सोडलं होतं. सुशांतकडे एक वेगळंच स्पिरिट होतं. तो भूमिकेसाठी फारच मेहनत घेत होता'. त्याची मेहनत पाहून धोनीही अवाक झाला होता. महेंद्र सिंह धोनीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, 'सुशांतने मला प्रश्न विचारून विचारून अक्षरशः हैराण केलं होतं. आम्ही जिथे जात होतो तिथे तो मला फॉलो करायचा. तो माझ्या प्रत्येक हालचाली बारकाईने न्याहाळत असायचा. मला त्याच्या उत्साहाचं आणि त्याच्या जिद्द्दीच खरंच कौतुक वाटतं. त्याची जिद्द पाहून मी खरंच प्रभावीत झालो होतो'. (हे वाचा:'मला सलमान खानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही', झरीन खान का संतापली?) सुशांत सिंह राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ मध्ये पटना, बिहार येथे झाला होता.सुशांतने इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं होतं. परंतु अभिनयाची असलेली आवड त्याला गप्प बसू देत नव्हती. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. 'पवित्र रिश्ता' या मालिकेने सुशांतला घराघरात पोहोचवलं होतं. या मालिकेतून तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यांनतर अभिनेत्याने बॉलिवूडकडे आपला मोर्चाचे वळवला होता. बॉलिवूडमध्ये सुद्धा फारच कमी वेळेत सुशांतने आपलं कौशल सिद्ध केलं होतं. त्याने अनेक दमदार चित्रपट देत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. परंतु १४ जून २०२० मध्ये अचानक त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आणि संपूर्ण देश हादरला. सुशांतला जाऊन दोन वर्षे होत आली परंतु आजही चाहते त्याला तितकंच प्रेम करतात.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या