Home /News /entertainment /

'मला सलमान खानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही', अभिनेत्री Zareen Khan का संतापली?

'मला सलमान खानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही', अभिनेत्री Zareen Khan का संतापली?

zareen khan & salman khan

zareen khan & salman khan

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने (zareen khan) सलमान खानसोबत (salman khan)‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. . झरीन खान ही बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात सक्रीय नसली तरी ती सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

    मुंबई, 20 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने (zareen khan) सलमान खानसोबत (salman khan)‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. . झरीन खान ही बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात सक्रीय नसली तरी ती सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. 2010 मध्ये सलमान खानने तिला लाँच केल्यानंतर तिच्या आणि सलमानच्या अफेअरबद्दल चर्चा चांगलीच रंगली होती. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये तिने सलमानसोबतच्या नात्यासंदर्भात आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. सलमानने तिला इतर अभिनेत्रींसारखी संधी दिल्याने कलाविश्वात सलामान तिला खासगी आयुष्यातही मदत करत असेल अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. या चर्चेवर झरीन चांगलीच संतापली असल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच झरीनने हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सलमान व तिच्या नात्यावर भाष्य केले. सलमान खान हा एक शानदार व्यक्ती आहे. पण तो फार व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी सलमान आणि त्याच्या भावांच्या पाठीवरचं माकड होऊ शकत नाही. मी जे काही काम करते ते सलमान खानच्या माध्यमातून मला मिळतं, असं लोकांना वाटतं. पण यात काहीही सत्य नाही. अशा शब्दात तिने सुरु असलेल्या चर्चेला धुडकावून लावले. तसेच, सलमान अजूनही माझी मदत करतो, असा अनेक लोकांचा समज आहे. मी सलमानचे आभार मानते. कारण तो नसता तर मी कधीच इंडस्ट्रीत आले नसते. त्याने मला इंडस्ट्रीत संधी दिली. पण इथूनच खºया अर्थाने माझा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी मला काहीही माहिती नव्हते असही ती यावेळी म्हणाली. यासोबतच खासगी आयुष्यावरही तिने मनमोकळे केले. माझे वडील आम्हाला लहान असताना सोडून गेले. त्यामुळे माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतली. मला मदत किंवा मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. मी फार घाबरली होती. अनेकदा मी इंडस्ट्रीत एकटी असहाय्य आहे, असे मला जाणवतं. मला चांगलं काम करायचं होतं. पण मला अभिनय कौशल्य दाखवायची परवानगी नव्हती. अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या