मुंबई, 17 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबावर आरोप लावले असून त्यांची चौकशी सुरू असताना रविवारी एका मिस्ट्री गर्लबाबत (Mystery Girl) संशय उपस्थित केला जाऊ लागला. सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशीचा व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसून आली आणि आता तिची ओळख आता समोर आली आहे.
सुशांतच्या बिल्डिंगमध्ये 14 जूनला दिसणाऱ्या त्या मिस्ट्री गर्लचा संबंध रियाचा भाऊ शोविकशी आहे. झी न्यूजने या तरुणीची ओळख पटल्याचं सांगितलं आहे. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी शोविकची मैत्रिणी जमीला असल्याचं सांगितलं जातं आहे. जमीला आपली मैत्रीण प्रियंका खेमानी आणि मित्र महेश शेट्टी यांच्यासह सुशांतच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर आली होती. मात्र पोलिसांनी त्यांना सुशांतच्या घरात जाऊ दिलं नाही आणि घराबाहेर ती सुशांतच्या स्टाफला भेटून गेली.
रियाच्या इन्टाग्रामवर अकाऊंटवरही जमीलाचा फोटो आहे. यामध्ये सुशांतदेखील आहे. रियाच्या शेजारी तिचा भाऊ शोविक आणि त्यासह जमीला उभी आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनी रिपब्लिक टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली होती. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी दिसत आहे. या तरुणीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.
हे वाचा - '13 जूनच्या रात्री 5 ते 6 जण आले होते सुशांतच्या घरी'; मित्राच्या दाव्याने खळबळ
एका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक तरुण सुशांतच्या पार्थिवाजवळ काळी बॅग घेऊन उभा होता. त्याने गुलाबी रंगाची टोपी घातलेली आहे. ही व्यक्ती सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत असल्याचं बोललं जात आहे. पण, काही वेळानंतर ही व्यक्ती बॅग घेऊन खाली उतरताना दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये निळ्या आणि पांढर्या रंगाच्या टॉपमध्ये एक तरुणीही दिसत आहे. ज्या ठिकाणी सुशांत राहत होता तिच्या कंपाऊंडमध्ये ही मुलगी आढळून आली. हीच मुलगी त्या व्यक्तीला भेटते. पण, जेव्हा हे दोघे जण भेटता तेव्हा दोघांच्या हातात काळी बॅग नव्हती. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीसही तिथेच होते.
हे वाचा - तुर्कीच्या फर्स्ट लेडीची आमिर खाननं घेतली भेट, 'या' कारणामुळे ट्विटवर झाला ट्रोल
या व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनीही आश्चर्य व्यक्त केले. जर घरातून कुणी काही वस्तू घेऊन जात असेल तर ते संशायस्पद आहे. ही मुलगी कोण आहे, ती तिथे काय करत होती. याची माहिती मिळाली पाहिजे, अशी मागणी सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह (Lawyer Vikas Singh) यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput