मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"सुशांतच्या स्टाफनेच केली त्याची हत्या", एक्स मॅनेजरचा खळबळजनक दावा

"सुशांतच्या स्टाफनेच केली त्याची हत्या", एक्स मॅनेजरचा खळबळजनक दावा

सुशांतचा माजी मॅनेजर अंकितने (sushant former manager ankit) सुशांतच्या स्टाफबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुशांतचा माजी मॅनेजर अंकितने (sushant former manager ankit) सुशांतच्या स्टाफबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुशांतचा माजी मॅनेजर अंकितने (sushant former manager ankit) सुशांतच्या स्टाफबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 17 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे, असा दावा अनेकांनी केला आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. आता सुशांतच्या स्टाफनेच ही हत्या केली असं खळबळजनक वक्तव्य सुशांतचा माजी मॅनेजर अंकितने (sushant former manager ankit) केला आहे.

सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादिवशीचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत एक तरुणी आणि तरुण दिसत आहे. हा तरुण म्हणजे सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत तर ती तरुणी म्हणजे रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकची मैत्रीण जमिला असल्याचं सांगितलं जातं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुशांतच्या कुटुंबाने त्या तरुणीवर संशय व्यक्त केला आहे तर सुशांतचा माजी मॅनेजर अंकितने सुशांतच्या स्टाफमधील सदस्यांनीच त्याची हत्या केल्याचा दावा केला आहे.

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत अंकित म्हणाला, "ही एक हत्या आहे. सुशांत कधीच आत्महत्या करू शकत नाही कारण तो सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्य जगणारा होता. मला नेहमीच त्याने एका लहान भावासारखं मानलं. जोपर्यंत मी त्याच्यासह काम केलं त्याला कधीच निराश पाहिलं नाही. पण तो आपल्या दिवंगत आईसाठी कविता लिहायचा आणि रडायचा. सुशांतसारखी पॉझिटिव्ह व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाईल आणि आपला जीव देईल असं होऊच शकत नाही"

हे वाचा - सुशांतच्या मृत्यूदिवशी त्याच्या घरी दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? समोर आली तिची ओळख

"सोशल मीडियावर दीपेश नावाच्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले. मी गेल्यानंतर दीपेशला सुशांतकडे कामावर ठेवण्यात आलं होतं. सुशांतची देखभाल करणं हे त्यांचं मुख्य काम होतं. सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करून झोपत नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे स्टाफच्या सदस्यांनी दरवाजा तोडला का नाही ते टाळा तोडणाऱ्या मेकॅनिकची वाट का पाहत राहिले?", असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.

हे वाचा - बिनधास्त कंगना रणौतला आता वाटू लागली भीती; सोशल मीडियावर झाली व्यक्त

अंकितने आपल्यालाही धमकीचे फोन आल्याचं सांगितलं. अंकित म्हणाला, "चार दिवसांपूर्वीच एका व्यक्तीचा फोन आला आणि सुशांतच्या मृत्यूचा साक्षीदार बनल्यास मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शिवाय परिस्थितीचा फायदा घेऊन प्रसिद्धी मिळवू नको, असा एका व्यक्तीचा मेसेजही आला.  सुशांत प्रकरणात मी आपल्या मार्गाने काम करतो आहे.  मी मुंबई पोलिसांकडे गेलो नाही किंवा मुंबई पोलिसांनीही माझा जबाब नोंदवला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची प्रतीक्षा आहे आणि आपण सीबीआयलाही मदत करण्यासाठी तयार आहोत"

First published:

Tags: Sushant Singh Rajput