जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतची धक्कादायक एक्झिट! धोनीच्या CSK नं दिली पहिली प्रतिक्रिया, असा शेवट...

सुशांतची धक्कादायक एक्झिट! धोनीच्या CSK नं दिली पहिली प्रतिक्रिया, असा शेवट...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. फक्त सुशांतच नाही याआधीही नैराश्यातून या बॉलिवूड कलाकारांनी आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. फक्त सुशांतच नाही याआधीही नैराश्यातून या बॉलिवूड कलाकारांनी आत्महत्या केली.

सुशांत सिंह राजपूतनं माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये ऑनस्क्रीन धोनीची भूमिका साकारली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांत मागच्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होता अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलीसांना दिली मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण नक्की नैराश्य होतं की आणखी काही याबाबत अद्याप पोलीस तपास सुरू आहे. आज दुपारी सुशांतच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यावर त्याच्या नोकरानं पोलिसांना याची माहिती दिली. सुशांतच्या अशा अचानक एक्झिटवर आता धोनीच्या CSK नं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह राजपूतनं माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये ऑनस्क्रीन धोनीची भूमिका साकारली होती. सुशांतच्या निधनानंतर अद्याप धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र त्याचा आयपीएल संघ CSK नं मात्र ऑफिशिअल ट्विटरवरून ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सुशांतचा या सिनेमातील फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिल, असा शेवट अपेक्षित नव्हता.

जाहिरात

CSK चं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांतनं त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. होती. मात्र त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं ते ‘कई पो छे’ या सिनेमातून. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमानं लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. अगदी अलिकडच्याच काळात रिलीज झालेला त्याचा ‘छिछोरे’ हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात