मुंबई, 27 डिसेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020रोजी त्याच्या वांद्राच्या राहत्या घरी मृत्यू झाला. त्यानं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असं तपासांती पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता दोन वर्षांनी या प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यानं सुशांतच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. आता या प्रकरणानंतर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली दावा कूपर हॉस्पिटलचे शवागार सेवक रूपकुमार शाह यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर श्वेताने भाऊ सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घ लढा दिला, जो अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सुशांतला न्याय मिळण्याची फारशी आशा नव्हती, मात्र रूपकुमार शाहच्या दाव्यानंतर सुशांतला आता न्याय मिळू शकेल असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. हेही वाचा - Salman Khan: आधी मिठी मारली अन नंतर केलं किस; सलमान खानचे EX गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सोबत फोटो व्हायरल दरम्यान, सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने सोशल मीडियावर रूपकुमार शाह यांना सुरक्षा पुरवण्याचे आवाहन केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केले आहे.
श्वेता सिंग कीर्ती यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘या पुराव्यात एक टक्काही सत्यता असेल तर आम्ही सीबीआयला या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती करतो. आपण या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून सत्य काय आहे ते बाहेर काढाल, असा आमचा नेहमीच विश्वास आहे. आम्हाला त्याच्यासोबत नक्की काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे.’
आणखी एका ट्विटमध्ये श्वेताने कूपर हॉस्पिटलच्या शवागाराच्या सेवकाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘रूप कुमार शाह यांच्या सुरक्षेची आम्हाला खात्री करावी लागेल.’ श्वेताच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर सर्वजण रूपकुमार शाह यांच्या सुरक्षेची मागणी करत आहेत. त्याचबरोबर सुशांतची दुसरी बहीण प्रियांकानेही याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुशांत सिंग राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला तुरुंगात जावे लागले होते आणि तिच्यावर सुशांतच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही होता. आता या प्रकरणात नवीन खुलासा झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.