बॉलिवूडच्या भाईजानचा आज वाढदिवस आहे. काल रात्री सलमान खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटसृष्टीतील आपल्या मित्रांसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती.
सलमान खानच्या या पार्टीत मात्र त्याची EX गर्लफ्रेंड संगिता बिजलानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये संगिता खूपच सुंदर दिसत होती.
त्याच्या अशा वागण्यातून त्याचे संगितावर अजूनही प्रेम आहे. त्याच प्रमाणे भूतकाळात झालेल्या कोणत्याही गोष्टीचा या दोघांवर सध्या कोणताच परिणाम झालेला नाही ही गोष्ट सिद्ध होते.
सलमान खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटसृष्टीतील त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी पार्टी ठेवली होती. यावेळी सलमानची EX गर्लफ्रेंड संगिता बिजलानीला पाहून चाहत्यांनी भुवया उंचावल्या.
सलमान खान आणि संगीता बिजलानी अजूनही मित्र आहेत आणि अनेकदा संगीता त्यांच्या घरी देखील दिसली आहे. लग्नानंतर संगीताने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले पण ती अनेकदा मीडियासमोर येते.