Home /News /entertainment /

'Selfie 4 SSR' म्हणत सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने चाहत्यांना केलं खास आवाहन: शेअर केला VIDEO

'Selfie 4 SSR' म्हणत सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने चाहत्यांना केलं खास आवाहन: शेअर केला VIDEO

सुशांतची बहीण श्वेतासुद्धा (Sushant Sister Shweta Singh Kirti) सतत आपल्या भावाच्या आठवणी शेअर करत असते. आजही श्वेताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावाला न्याय मिळावा असं आवाहन केलं आहे.

  मुंबई, 7 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या   (Sushant Singh Rajput)   निधनाने संपूर्ण देश हादरला होता.सुशांतच्या मृत्यूला आता जवळजवळ दोन वर्षे होत आली आहेत. परंतु आजही त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आठवणी जशाच्या तश्या आहेत. चाहते दररोज सोशल मीडियावर सुशांतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत असतात. चाहते सतत त्याला न्याय मिळवून देण्याचं आवाहन करत असतात. तसेच सुशांतची बहीण श्वेतासुद्धा   (Sushant Sister Shweta Singh Kirti)   सतत आपल्या भावाच्या आठवणी शेअर करत असते. आजही कीर्तीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावाला न्याय मिळावा असं आवाहन केलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच भावुक करणारा आहे. यामध्ये एका बाजूला सुशांत सिंहचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या चाह्ह्त्यांचा फोटो जे हातात 'जस्टीस फॉर सुशांत' चा फलक घेऊन सुशांतला न्याय मिळून देण्याचं आवाहन करत आहेत. या व्हिडीओमध्ये चाहते सुशांतचा फोटो आणि फलक घेऊन त्याच्यासाठी लढत आहेत. शिवाय या व्हिडीओच्या मागे सुशांतच्या केदारनाथ चित्रपटातील 'नमो नमो हे शंकरा...' हे गाणं ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून इतर चाहतेसुद्धा भावुक होत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. शिवाय ते सुद्धा सुशांतला न्याय मिळवून देण्याचं आवाहन करत आहेत.
  अभिनेता सुशांत सिंहची बहीण श्वेताने आपल्या इन्स्टावर हा फोटो शेअर करत सुशांतसाठी लिहिलं आहे, 'माझं हृदय, माझी आत्मा,माझं जग,माझा जिगरी, माझं सगळंकाही'. सोबतच श्वेताने #JusticeFor Sushant Singh Rajput हा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे.तसेच श्वेताने सुशांतच्या फोटोसोबत सेल्फी घेण्याचं आवाहन केलं आहे. कारण या महिन्याच्या 14 तारखेला सुशांतचा वाढदिवस आहे. यामुळे तिनं हा महिना सुशांतचा असल्याचं म्हटलं आहे. चाहतेसुद्धा आपल्या कमेंटमध्ये या हॅशटॅगचा वापर करत आहेत. काहींनी कमेंट करत सुशांत सिंह राजपूतच्या केसची अपडेट समजावी अशी घ्यायची विनंती केली आहे. (हे वाचा:ती कोणत्याच अँगलने झूलन नाही...' Chakda Xpress मधील लुकमुळे अनुष्का ट्रोल) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची बहीण श्वेता सिंह कीर्ती यांचं फार छान बॉन्डिंग होतं. ते सतत एकेमकांसोबत वेळ घालवताना दिसून येत होते. आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी ते सोबत राहिले आहेत. श्वेता सुशांतसोबतचे अनेक फोटोसुद्धा शेअर करत होती. तर सुशांत अनेकवेळा श्वेताच्या मुलासोबत खेळताना दिसून येत होता. ती भारताबाहेर राहते. त्यामुळे ती सतत सोशल मीडियावरून आपल्या भावावर प्रेम व्यक्त करताना दिसून आली होती. सुशांतच्या अचानक जाण्याने तिला मोठा धक्का बसला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Sushant sing rajput

  पुढील बातम्या