मुंबई, 6 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तब्बल (Anushka Sharma) 3 वर्षांनंतर चित्रपटात झळकणार आहे. नुकताच तिच्या Chakda Xpress चित्रपटाचा एक टीजर रिलीज झाला आहे. हा टीजर तिच्या चाह्त्यांना पसंत पडला असला तरी, नेटकरी अनुष्काला प्रचंड ट्रोल करत आहेत. अनुष्काचा हा लूक पाहून चाहते तिची खिल्ली उडवत आहेत. अभिनेत्री कोणत्याच अँगलने झुलन गोस्वामी यांच्यासारखी दिसत नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी अनुष्काला कमेंट करत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Time to scream HOWZZAT cause we can’t contain the excitement to see @AnushkaSharma hitting the wickets like #JhulanGoswami in Chakda ‘Xpress, filming soon 🥳😍@OfficialCSFilmz @prosit_roy #KarneshSSharma #AbhishekBanerjee @manojmittra @saurabh0903 @rajneesh_chopra pic.twitter.com/Z0uJoh82jE
— Netflix India (@NetflixIndia) January 6, 2022
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काहीवेळापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे.हा व्हिडीओ म्हणजे तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आहे. यामध्ये अनुष्काचा फर्स्ट लूक पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. अनुष्का शर्मा हातात बॅट घेऊन एका क्रिकेटरच्या रूपात दिऊन येत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार झूलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अनुष्काचा फर्स्ट लूक पाहून चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचं स्प्ष्ट झालं आहे. अनुष्काने शेअर केलेला हा व्हिडीओ फारच इंटरेस्टिंग आहे. या व्हिडीओची सुरुवात क्रिकेट स्टेडियमवर होते. जिथे इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा सामना रंगणार असतो. व्हिडीओमध्ये त्या वेळेची महिला क्रिकेट संघाची अवस्था चित्रित करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये महिला क्रिकेट संघाला ना स्वतःची जर्सी असते ना ओळख. आणि स्टेडियमवर चिअरअप करण्यासाठी एकही प्रेक्षक नसतो. परंतु अनुष्का शर्मा अर्थातच झूलन गोस्वामी यांची जिद्द आणि विश्वास पाहून सर्वच थक्क होतात.