'सिनेमात काम मिळालं नाही तर मी...' सुशांतचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल

'सिनेमात काम मिळालं नाही तर मी...' सुशांतचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडच्या घराणेशाहीचा वाद सुरू झाल्यानंतर सुशांतचा एक व्हिडीओ फारच चर्चेत आला आहे. ज्यात त्यानं सिनेमात काम मिळालं नाही तर त्याचा काय प्लान आहे हे त्यानं सांगितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 17 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं रविवारी 14 जूनला त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेहमीच हसतमुख आणि एनर्जेटिक राहणाऱ्या या अभिनेत्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशात सोशल मीडियावर त्याचे बरेच थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र घराणेशाहीचा वाद सुरू झाल्यानंतर सुशांतचा एक व्हिडीओ फारच चर्चेत आला आहे. ज्यात त्यानं सिनेमात काम मिळालं नाही तर त्याचा काय प्लान आहे हे त्यानं सांगितलं होतं.

सुशांत किती पॉझिटीव्ह व्यक्ती होता हे त्याच्या या व्हायरल व्हिडीओवरून लक्षात येत आहे. सुशातचा हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सुशांत सांगताना दिसतो, 'जेव्हा मी टीव्ही सोडलं तेव्हा मी विचार केला होता की, मला जर सिनेमात काम मिळालं नाही तर मी फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टिन सुरू करेन. स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करेन.'

या व्हिडीओमध्ये सुशांत सांगतो, माझा जो पहिला सिनेमा आहे 'काय पो छे' त्याच्यासाठी मी 12 वेळा ऑडिशन दिली होती. दुसरा सिनेमा पीके त्यासाठी मी 3 वेळा ऑडिशन दिली आहे. माझा तिसरा सिनेमा यशराज बॅनरचा होता. ज्यासाठी मी 1 महिना वर्कशॉप केलं होतं आणि ऑडिशन दिली होती. बेस्ट पार्ट हा होता की, अभिषेक, आदित्य चोप्रा किंवा मिस्टर हिरानी यांनी माझं टीव्हीवरील काम पाहिलं नव्हतं आणि त्यांना माहित सुद्धा नव्हतं की मी कोण आहे. त्यांनी माझे ऑडिशन व्हिडीओ पाहून माझी निवड केली होती.

सुशांतचं म्हणणं होतं की, जर तुमच्यात काहीतर चांगलं काम करण्याची क्षमता आणि धैर्य असेल तर मला नाही वाटत या इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं तुमच्यासाठी कठीण आहे. सुशांतचा हा व्हिडीओ आणि त्याची पॉझिटीव्हीटी पाहून सर्वाच अवाक झाले आहेत. त्याच्या या व्हिडीओ अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे एवढा पॉझिटीव्ह असलेल्या या व्यक्तीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दिग्दर्शक अभिनव कश्यपनं सलमान खानवर केले गंभीर आरोप, भाऊ अनुराग म्हणतो...

कोणामुळे सुशांतला त्रास झाला? चाहत्यांच्या प्रश्नाला शेखर कपूर यांचं उत्तर

First published: June 17, 2020, 1:32 PM IST

ताज्या बातम्या