इंडस्ट्रीतल्या कोणत्या व्यक्तींमुळे सुशांतला त्रास झाला? चाहत्यांच्या प्रश्नाला शेखर कपूर यांचं उत्तर

इंडस्ट्रीतल्या कोणत्या व्यक्तींमुळे सुशांतला त्रास झाला? चाहत्यांच्या प्रश्नाला शेखर कपूर यांचं उत्तर

सुशांतच्या निधनानंतर शेखर कपूर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सुशांतला इंडस्ट्रीतल्या कोणत्या व्यक्तींमुळे त्रास झाला असं म्हटलं होतं. त्यांनतर अनेक चाहत्यांनी त्यांना या लोकांची नावं विचारली होती.

  • Share this:

मुंबई, 17 जून : बॉलिवूड दिग्दर्शक शेखर कपूर यांन सांगितलं की, काही महिण्यांपूर्वी सुशांत सिंह राजपूत त्यांच्यासोबत 'पानी' या सिनेमावर काम करत होता. पण काही व्यवसायिक कारणांनी हा सिनेमा शूट होऊ शकला नाही. शेखर कपूर आणि सुशांत यांच्यात सिनेमाबाबत तासंतास चर्चा होत असत. जेव्हा सिनेमा शूट होणार नाही असं कळलं तेव्हा सुशांत शेखर कपूर यांना फोन करून ढसाढसा रडला होता. सुशांतच्या निधनानंतर शेखर कपूर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सुशांतला इंडस्ट्रीतल्या कोणत्या व्यक्तींमुळे त्रास झाला असं म्हटलं होतं. त्यांनतर अनेक चाहत्यांनी त्यांना या लोकांची नावं विचारली होती. ज्यावर आता शेअर कपूर यांनी उत्तर दिलं आहे.

शेखर कपूर यांनी सुशांतच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं, मला माहित आहे, तू कोणत्या दुःखातून जात होतास. मला माहित आहे कोणी तुला अपमानीत केलं होतं. तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होतास. किती बरं झालं असतं जर मागचे सहा महिने मी तुझ्या सोबत असतो किंवा तू माझ्यापर्यंत पोहोचू शकला असतास. जे झालं ते त्या लोकांचं कर्म होतं, तुझं नाही.

शेखर कपूर यांच्या या ट्वीटनंतर एक युजरनं त्यांना टॅग करून लिहिलं, सर जर तुम्हाला सत्य माहित आहे तर मग तुम्ही सांगून टाका. त्यामुळे इतर लोकांचा जीव वाचेल. तर आणखी एका युजरनं लिहिलं, तुम्ही या लॉबीच्या विरोधात बोलायला हवं.

युजर्सच्या सततच्या कमेंटनंतर शेखर कपूर यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, काही लोकांची नावं घेण्यात काही अर्थ नाही. ते स्वतः एका उत्पादनाप्रमाणे आहेत आणि या सिस्टिमची शिकार झालेले आहेत. जर तुम्हाला याची खरंच पर्वा असेल तर, राग असेल तर तुम्ही ही सिस्टिम बदण्यासाठी प्रयत्न करा. एकट्याने नाही तर सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे.

याशिवाय इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये शेखर कपूर यांनी सांगितलं होतं, 'पानी' सिनेमात सुशांत गोराची भूमिका साकारणार होता. तो माझ्यासोबत प्रॉडक्शन मिटिंगमध्ये असायचा, तो व्हीएफएक्स मिटिंगमध्ये असायचा, वर्कशॉपमध्ये असायचा. त्याच्याकडे शिकण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा त्याचा उत्साह एखाद्या लहान मुलाप्रमाणे होता.

First published: June 17, 2020, 10:57 AM IST

ताज्या बातम्या