KBC मधील फक्त 10 हजार रुपये जिंकून बाहेर पडली अमिताभ बच्चन यांची 'बहिण'

धडाधड उत्तरं देत जाहिरा 1.60 लाखांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. मात्र त्यानंतरच्या प्रश्नासाठी अमिताभ यांनी दिलेली हिंट त्या समजू शकल्या नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 11:55 AM IST

KBC मधील फक्त 10 हजार रुपये जिंकून बाहेर पडली अमिताभ बच्चन यांची 'बहिण'

मुंबई, 28 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपतीचा 11 सीझन दिवसेदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. नुकत्याच 27 डिसेंबरला प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक जाहिरा रियाज हुंडेकर अवघे 10 हजार रुपये रुपये जिंकून शोमधून बाहेर पडल्या. जाहिरा यांनी धमाकेदार अंदाजात खेळायला सुरुवात केली आणि धडाधड उत्तरं देत 1.60 लाखांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. दरम्यान त्यांनी फक्त 1 लाइफलाइन वापरली होती. मात्र 3.20 लाख रुपयांच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यानं त्यांना पक्त 10 हजार रुपयांवरच समाधान मानावं लागलं.

अमिताभ बच्चन यांना जाहिरा पाठवायच्या राखी

केबीसीमध्ये जाहिरा यांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला. जाहिरा दरवर्षी रक्षाबंधनला अमिताभ बच्चन यांना राखी पाठवत असत. एवढंच नाही तर अमिताभ यांनीही त्यांची राखी स्वीकारत त्यांना पत्र सुद्धा लिहिलं होतं. या शोमध्ये जाहिरा यांनी अमिताभ यांनी उत्तरादखल पाठवलेलं हे पत्र सुद्धा दाखवलं. ज्यात अमिताभ यांनी त्यांचा आगामी सिनेमा 'शहंशाह'बद्दल लिहिलं होतं. जाहिरा यांचं शिक्षण बी कॉम पर्यंत झालं असून त्यांनी गणितीय प्रश्नांची उत्तर खूपच जलद दिली. मात्र अमिताभ यांनी दिलेली हिंट त्या समजू शकल्या नाहीत.

लतादीदी@90 : या राजकुमारावर लता मंगेशकरांचं होतं प्रेम, पण...

Loading...

चुकीच्या उत्तराआधी अमिताभ यांनी दिली होती हिंट

महाकाव्य पृथ्वीराज रासोमध्ये पृथ्वीराज चौहान आणि प्रमुख्यानं खालीलपैकी यांच्यात युद्ध झालं होत असं वर्णन आहे. याप्रश्नाचं उत्तर देताना जाहिरा म्हणाल्या मला वाटतं सी हा पर्याय योग्य आहे. त्यावर अमिताभ म्हणाले तुम्ही पुन्हा पुन्हा मला वाटतं मला वाटतं असं म्हणू नका पहिलं खात्री करा आणि मग उत्तर द्या.

'तारक मेहता...'च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, 'या' दिवशी परतणार दयाबेन

मात्र यानंतरही जाहिरा यांनी उत्तर म्हणून सी हा पर्याय म्हणजे, महमूद गजनवी यांना निवडलं. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर मुहम्मद गौरी होतं. जाहिरा हारल्यानंतर अमिताभ खूप निराज झालेले दिसले जसं की हे त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे.

जाहिरा यांना विचारण्यात आलेले अन्य प्रश्न

प्रश्न : माजी बॉलीबॉल खेळडू विजया आणि पुसरला वेंकट रमन्ना कोणत्या भारतीय ऑलम्पियनचे आई-वडील आहेत?

उत्तर: पी. व्ही. सिंधू

प्रश्न : भारतच्या नव्या कायद्यानुसार, तीन वेळी तलाक बोलून घटस्फोट देणाऱ्या मुस्लिम पतीला अधिकाधिक किती वर्षांची सजा होऊ शकते?

उत्तर: 3 वर्षे

प्रश्न : इन्फोसिसचे पहिले सीईओ कोण होते?

उत्तर: नारायण मूर्ति

प्रश्न : हे मूळ गाणं कोणत्या सिनेमातील आहे?

उत्तर: मुकद्दर का सिकंदर

प्रश्न : लक्ष्मण भोग, मलीहाबादी, अप्पेमिडी, बंगानापल्ले, मराठवाडा आणि गीर केसर या कोणत्या फळाच्या जाती आहेत?

उत्तर: आंबा

प्रश्न : फक्त 10 रुपयांच्या नोटांनी बनलेल्या एका बंडलची किंमत जर 5010 रुपये असेल तर त्या बंडलमध्ये किती नोटा असतील?

उत्तर: 501

प्रश्न : या म्हणीच्या सुरुवातील खालीलपैकी कोणते शब्द येतील— ... खतरा ए जान

उत्तर: नीम हकीम

प्रश्न : यालीलपैकी कोणत्या खाद्यपदार्थावर चांदी वर्क मिळण्याच्या शक्यता सर्वाधिक आहेत?

उत्तर: काजूकतली

...म्हणून अभिनेता अक्षय कुमार चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूच्या निशाण्यावर

==============================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...