जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / या आठवड्यात कोण असेल NCB च्या निशाण्यावर; सारा आणि श्रद्धा कपूर यांच्या चौकशीची शक्यता

या आठवड्यात कोण असेल NCB च्या निशाण्यावर; सारा आणि श्रद्धा कपूर यांच्या चौकशीची शक्यता

या आठवड्यात कोण असेल NCB च्या निशाण्यावर; सारा आणि श्रद्धा कपूर यांच्या चौकशीची शक्यता

रियाने आपल्या जबाबात सांगितले आहे की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यासाठी बोलविण्यात येण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर आता या दोन अभिनेत्रींची NCB कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रिया चक्रवर्तीसोबत झालेल्या चौकशीदरम्यान या दोघींची नावे समोर आली आहेत. रियाला 9 सप्टेंबर रोजी सुशांतला ड्रग्ज उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षा झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB (Narcotics Control Bureau) या दोन्ही अभिनेत्रींना या आठवड्यात समन्स बजावू शकते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी होणार आहे. रियासोबत चौकशीदरम्यान चित्रपटसृष्टीतील 25 जणांचं नाव समोर आलं होतं. अशात एनसीबी याचा तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान एका हाय प्रोफाइल ड्रग्ज पॅडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत होती. साराकडून ड्रग्ज घेत रियाने सुशांत सिंह राजपूतपर्यंत पोहोचवलं होतं.  गेल्या काही दिवसांत सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनचा शोध करणाऱ्या एजंसी एनसीबीला मोठं यश मिळालं होतं. मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केल्यानंतर एनसीबीने 6 जणांचा पकडलं होतं. या 6 जणांचे संबंध बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटशी असल्याचे सांगिजले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. हे ही वाचा- “अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यूड झाला आणि…”, पायल घोषने केला ‘त्या’ घटनेचा उलगडा रियाने आपल्या जबाबात सांगितले आहे की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात