जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश सापडले, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश सापडले, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश सापडले, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

या रिपोर्टमधील माहिती समोर आल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला (Sushant singh rajput case) तीन महिने उलटून गेल्यानंतरही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयच्या हाती सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणातील विविध कंगोरे समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा असणारा व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला असून त्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे. सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश असल्याचं व्हिसेरा रिपोर्टमधून समोर आलं आहे. केमिकलमुळेच सुशांतचा मृत्यू झाला का, याचा तपास होणार आहे. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिलं आहे. सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली होती? याबाबतच्या निष्कर्षावर येण्यासाठी व्हिसेरा रिपोर्टची मदत होण्याची शक्यता आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आली, असा आरोप सुरुवातीपासूनच एका गटाकडून करण्यात येत आहे. यामध्ये सुशांतच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. अशातच आता सुशांतच्या शरीरात केमिकल होतं, असा खुलासा व्हिसेरा रिपोर्टमधून झाल्यामुळे याबाबतच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे. दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. सलमान खान (Salman khan), करण जोहरसह (Karan johar) 8 मोठ्या सेलेब्रिटींना 7 ऑक्टोबरला कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. मुझफ्फरपूर (muzaffarpur) जिल्हा कोर्टाने हा आदेश दिला आहे. या 8 जणांमध्ये अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर बड्या असामींचा समावेश आहे. या सगळ्यांविरोधात इथळ्या न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली. त्याच्या सुनावणीदरम्याने कोर्टाने या सेलेब्रिटींना नोटिसा बजावल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात