मुंबई, 26 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajpout) जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं त्याच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी धक्कादायक होतं. त्याचा मित्रपरिवार आणि सहकलाकार देखील त्याच्या आठवणी शेअर करत आहेत. दरम्यान तो त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्यात नेहमी राहील अशी प्रतिक्रिया सर्वांकडूनच ऐकायला मिळत आहे. तर अशाच सुशांतच्या चित्रपटांमध्ये आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. मात्र सुशांतचा हा चित्रपट सिनेमागृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (sushant sing rajput) शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ (Dil bechara) ऑनलाइन रिलीज होण्याची घोषणा झाली. हा चित्रपट ऑनलाईन नव्हे तर थिएटरमध्ये रिलीज करावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी केली. तरी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) रिलीज केला जाणार आहे. मात्र तो फ्रीमध्ये पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना देण्यात आली आहे. (हे वाचा- ‘सुशांतच्या जन्मासाठी व्रत केलं पण..’,मृत्यूनंतर वडिलांची हृदयद्रावक प्रतिक्रिया ) दिल बेचारामध्ये सुशांतबरोर संजना सांघी (Sanjana Sanghi) हा नवा चेहरा दिसणार आहे. दरम्यान चित्रपटाबाबत संजनाने एक पोस्ट इन्स्टाग्रावर शेअर करत सद्य परिस्थितीबाबत आणि सुशांतबाबत भाष्य केले आहे. ऑन स्क्रिन सुशांत संजनाचा पहिला ‘हिरो’ आहे. त्यामुळे तिच्यासाठी सुशांतचे असे निघून जाणे धक्कादायक होते. तिने चित्रपटाबाबत एक ऑडिओ शेअर करत लांबलचक कॅप्शन देत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा ऑडिओ ऐकल्यावर हे जाणवते की तिचा आवाज देखील जड झाला आहे. (हे वाचा- VIDEO : वडिलांनी सुशांतला दिला होता खास जीवनमंत्र, अभिनेत्याने केला होता खुलासा ) ‘परदा अभी बडा नही हो सकता, लेकिन दिल तो बडा हो सकता है ना?’ अशी सुरूवात करत तिने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. त्यानंतर एक पर्सनल नोट लिहित तिने प्रेक्षकांना चित्रपट ओटीटीवर पाहण्याचे आवाहन केले आहे. ती पुढे म्हणाली की, ‘एका वेगळ्या नजरेने आयुष्य बघायचा प्रयत्न करतेय. विचार केला तुमच्याशी थोड्या गप्पा मारेन. यावेळी दु:ख खूप आहे, आणि ते एकट्याने निभावणं कठीण आहे.’
संजना सांघीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होत असताना तिचा पहिला-वहिला ‘हिरो’ तिच्याबरोबर नाही आहे. हे तिच्या आवाजातून स्पष्ट जाणवत आहे. यावर सुशांतच्या चाहत्यांनी देखील खूप कमेंट्स केल्या आहेत. सुशांत आणि संजनाना ‘दिल बेचारा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘The Fault in Our Stars’ या इंग्रजी सिनेमाचा हिंदी रिमेक ‘दिल बेचारा’ 8 मे 2020 ला प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यामध्ये दोघांचा रोमान्स त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.