मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बापरे! 'बाहुबली'बरोबर एका सिनेमात काम करण्यासाठी दीपिकाने आकारले एवढे कोटी

बापरे! 'बाहुबली'बरोबर एका सिनेमात काम करण्यासाठी दीपिकाने आकारले एवढे कोटी

अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या प्रभासबरोबरच्या आगामी सिनेमासाठी एवढी फी आकारली आहे की, ती भारतीय सिनेमातील सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री बनली आहे.

अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या प्रभासबरोबरच्या आगामी सिनेमासाठी एवढी फी आकारली आहे की, ती भारतीय सिनेमातील सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री बनली आहे.

अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या प्रभासबरोबरच्या आगामी सिनेमासाठी एवढी फी आकारली आहे की, ती भारतीय सिनेमातील सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री बनली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 23 जुलै : कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. मात्र सध्या देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू शूटिंग देखील सुरू झाले आहे. नवीन सिनेमांच्या घोषणाा देखील होऊ लागल्या आहेत. दरम्यान या महिन्यात झालेली सर्वात मोठी घोषणा म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण (Deepika Padukone) आणि बाहुबली 'प्रभास' (Prabhas) एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या सिनेमाबाबत काही रंजक माहिती समोर येत आहे. काही मीडिया अहवालांनी दीपिकाने या सिनेमासाठी आकारलेल्या चार्जचा दावा करण्यात येत आहे. अशी माहिती समोर येत आहे की, दीपिकाने या चित्रपटासाठी  एवढी फी आकारली आहे की, ती भारतीय सिनेमातील सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री बनली आहे.
(हे वाचा-आता प्रियंका आणि दीपिकाची मुंबई पोलीस करणार चौकशी, हे प्रकरण भोवण्याची शक्यता)
दीपिका-प्रभास ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. बॉलिवूड हंगामने दिलेल्या अहवालानुसार सूत्रांची अशी माहिती समोर येत आहे की, दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी मानधन मागितले आहे. या अहवालानुसार दीपिका सध्या अभिनेत्याचे मानधन जेवढे असेल तेवढ्याच मानधनाची मागणी करते. मानधनामध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्या समान वागणूक मिळावी या मताची दीपिका आहे. मात्र या अहवालाच्या मते दीपिकाचे मानधन प्रभास इतके नाही आहे. प्रभास या सिनेमासाठी 50 कोटी घेत आहे. दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी मानधन घेतल्यास ती Highest Paid अभिनेत्रीचा स्वत:चाच रेकॉर्ड मोडेल. पद्मावतमध्ये दीपिकाने सर्वात जास्त म्हणजे 13 कोटींचे मानधन घेतले होते.
(हे वाचा-सोनू सूदचा मजुरांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात, नोकरी शोधण्यासाठी लाँच केलं अ‍ॅप)
दरम्यान काही दिवसांपूर्वी वैजयंती मुव्हीजने भारतीय सिनेमामध्ये त्यांचा 50  वर्षांचा प्रवास अधोरेखित करत बाहुबली प्रभास आणि दीपिका पदूकोणबरोबर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. वैजयंती मुव्हीजने याबाबत आधी पोस्ट केली होती की, चाहत्यांसाठी ते काहीतरी खास घेऊन येणार आहेत. त्यांनंतर त्यानी अशी पोस्ट केली आहे की 'वचन दिल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत. एक मोठी घोषणा करत आहोत. WELCOMING THE SUPERSTAR' अशी पोस्ट त्यांनी केली आहे. #DeepikaPrabhas असा हॅशटॅग वापरून त्यांनी या नवीन प्रोजेक्टबाबत घोषणा केली आहे. दरम्यान दीपिकाने वैजयंती मुव्हीजची ही पोस्ट रिपोस्ट करत ती याबाबत किती उत्सूक आहे ते सांगितले होते.

First published:

Tags: Deepika padukone, Prabhas

पुढील बातम्या