Home /News /entertainment /

'सुशांत आत्महत्या करण्या इतका कमजोर नव्हता...', EX-गर्लफ्रेंड अंकिता वक्तव्याबाबत ठाम

'सुशांत आत्महत्या करण्या इतका कमजोर नव्हता...', EX-गर्लफ्रेंड अंकिता वक्तव्याबाबत ठाम

अंकितानं फोन लगेच कट केला. सुशांतच्या आत्महत्येनं अंकिताही प्रचंड दु:खी आणि अस्वस्थ झाली आहे.

अंकितानं फोन लगेच कट केला. सुशांतच्या आत्महत्येनं अंकिताही प्रचंड दु:खी आणि अस्वस्थ झाली आहे.

रिया त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अंकिताला सुशांतची बहिण आणि त्याच्या मित्रांकडून मिळाली होती.

    मुंबई, 31 जुलै : 'सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल', असे मत अभिनेत्री आणि सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने व्यक्त केले आहे. बिहार पोलिसांकडून अंकिताची चौकशी करण्यात आली. यामध्ये तिने अनेक बाबींचा खुलासा केला आहे. तिने यावेळी अशी माहिती दिली आहे की, सुशांतच्या कुटुंबीयांशी तिची नेहमी बातचीत होत असे. त्याच्याबाबत त्याच्या जवळच्या मित्रांकडून समजत असे, सुशांत-अंकिताचा जास्त संपर्क नव्हता. मात्र रिया त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अंकिताला सुशांतची बहिण आणि त्याच्या मित्रांकडून मिळाली होती. सुशांतचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी बिहार पोलिसांनी फोनवरून संभाषण केले आहे. मात्र आज याप्रकरणी समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. बिहार पोलिसांकडून साधारण 10 जणांचे जबाब आज नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाटणा पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट आणि या प्रकरणाशी निगडीत इतर काही पुरावे देखील पडताळून पाहणार आहेत. विवेक मल्होत्रा (Vivek Malhotra) नावाची व्यक्ती देखील सुशांतच्या संपर्कात होती. त्यांची देखील याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. वाचा-'सुशांत स्वतःच्या मर्जीने काहीच करू शकत नव्हता...' जवळच्या मित्राचा रियावर आरोप आतापर्यंत या प्रकरणाात सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, त्याची बहिण मितू सिंह आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी या महत्त्वाच्या लोकांची चौकशी झाली आहे. दरम्यान इतरही काही लोकांची चौकशी बिहार पोलिसांकडून सुरू आहे. अंकिताने अशी माहिती दिली होती की शांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता. तर बहिण मितू सिंहने देखील रियावर विविध आरोप केले आहेत. तिने अशी माहिती दिली होती की, सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत असते. ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या नोकराने सांगितली होती. आत्महत्येच्या दोन दिवस आधी दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती देखील तिने दिली होती. वाचा-सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव? सुशांत सिंह राजपूत तपास प्रकरणावरून राजकीय वादंग विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखव करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लाॅंड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांच्या ट्विटनंतर सुशांत सिंह प्रकरणात ईडी चौकशी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान आज एकाच दिवशी अनेक भाजपचे नेते या प्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या