मुंबई, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांसह कंगना रणौत, कुस्तीपटू बबिता फोगटनेही बॉलीवूडवर संताप व्यक्त केला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधल्या नेपोटिझमला दोष लावला जातो आहे. कॉफी विथ करणमध्ये सुशांत सिंह राजपूतबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे करण जोहर, आलिया भटनंतर आता सोनम कपूरही (sonam kapoor) ट्रोल झाली आहे. सोनम कपूरचा तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
'कॉफी विथ करण'च्या चौथ्या सिझनमध्ये सोनम कपूर सहभागी झाली होती. त्यावेळी 'हॉट ऑर नॉट' या गेममध्ये करणने काही अभिनेत्यांची नावं विचारली होती. त्यावेळी रणबीर कपूर, इम्रान खान हे extremely hot असल्याचं सोनम म्हणाली. मात्र जेव्हा सुशांत सिंह राजपूतबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती थोडा वेळ थांबली आणि त्यानंतर ती म्हणाली, "हॉट असावा, मला माहिती नाही. मी त्याच्या फिल्म पाहिल्या नाहीत" आणि तिच्या या उत्तरानंतर करण जोहरही हसला आहे.
#SonamKapoor is also responsible for Sushant Singh Rajput murder.
'सुशांत सिंह राजपूतच्या हत्येला सोनम कपूरही जबाबदार आहे", असा आरोप ट्वीटर युझरने केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोनमने केलेल्या ट्वीटनंतर सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिच्या ट्वीटनंतर कॉफी विथ करणमधील तिच्या या व्हिडीओवरून आता नेटिझन्स तिला ट्रोल करू लागलेत.
Blaming a girlfriend , ex girlfriend, family , colleagues for someone’s death is ignorant and fucking mean spirited.
सोनमनं लिहिलं, "एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंबीय आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना दोष देणं चुकीचं आहे", सोनमच्या या ट्वीटवर सध्या नेटकरी भडकले असून त्यांनी तिला चांगलंच खडसावलं आहे.
Karan Johar : who would u kill marry or hookup with