मुंबई 29 मार्च: पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) या भारतीय सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अनोख्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं होतं. 80 च्या दशकात त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. याकाळात प्रदर्शित झालेल्या जवळपास प्रत्येक चित्रपटात त्यांनी काम करावं अशी निर्मात्यांची इच्छा होती. परंतु वेळेअभावी त्यांना ते शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी काही चित्रपटांना नकार देखील दिला. ‘राम तेरी गंगा मैली’ (Ram Teri Ganga Maili) हा त्यातीलच एक चित्रपट होता. परंतु या चित्रपटामुळं अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) रातोरात सुपरस्टार झाली. पाहा काय होता तो किस्सा....
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केलं होतं आणि त्यात अभिनेता राजीव कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरपहिट ठरला होता. या चित्रपटात काम करण्यासाठी आधी पद्मीनी कोल्हापुरे यांना विचारण्यात आलं होतं. चित्रपटाची पटकथा पाहून त्यांनी होकारही दिला होता. पण चित्रीकरणाच्या पूर्वी दिग्दर्शकांनी यामध्ये काही चुंबनदृश्य वाढवली. अन् त्यांनी ती दृश्य करण्यास नकार दिला. अर्थात चित्रपटात किसिंग सीनची खरचं गरज असते का? असा थेट सवाल त्यांनी राज कपूर यांना केला. परंतु ते सीन काढण्यास त्यांनी नकार दिला. अखेर केवळ चुंबनदृश्य करावी लागतील म्हणून पद्मीनी कोल्हापुरे यांनी चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला.
अवश्य पाहा - ‘अन् त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला’; अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्याचं कारण
त्यानंतर त्यांच्याजागी मंदाकिनी या नव्या अभिनेत्रीची निवड केली गेली. अन् तिनं ती दृश्य करण्यास होकार देखील दिला. त्या किसिंग सीनमुळं राम तेरी गंगा मैली हा चित्रपट सुपरहिट झाला. अन् रातोरात मंदाकिनी तरुणांच्या गळ्यातील ताईत झाली. त्यांनंतर मंदाकिनी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 80-90च्या दशकात त्यांना बॉलिवूडमधील सर्वात धाडसी अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं.
अवश्य पाहा - देवमाणूसमधील ठरला डॉक्टर सर्वोत्कृष्ट खलनायक; एका क्लिकवर पाहा Zee Marathi Awards विजेत्यांची यादी
पद्मीनी कोल्हापुरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. ‘एक दुजे के लिये’मधील रती अग्निहोत्री, ‘सिलसिला’मधील रेखा आणि ‘तोहफा’मधील श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिका मला ऑफर झाल्या होत्या असं त्या अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. शिवाय राम तेरी गंगा मैली हा चित्रपट सोडल्याचं वाईटही वाटत होतं असंही त्यांनी मान्य केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.