सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित होता मित्र सिद्धार्थ, पोलिसांकडून पुन्हा चौकशी

सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित होता मित्र सिद्धार्थ, पोलिसांकडून पुन्हा चौकशी

14 जून रोजी जेव्हा सुशांत सिंह राजपूतने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्याचा मित्र सिद्धार्थ पिथानी सुशांतच्या वांद्रे येथील घरामध्ये उपस्थित होता.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी आणि तपास सुरू आहे. बुधवारी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी याची देखील चौकशी करण्यात आली. सिद्धार्थ पिथानी सुशांतचा मित्र तर होताच पण त्याचबरोबर तो त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून देखील काम पाहायचा. दरम्यान अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे  h

सुशांत सिंह राजपूत या हरहुन्नरी अभिनेत्याने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुशांतने गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मात्र तो या निर्णयापर्यंत का पोहोचला आणि त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास वांद्रे पोलिसांकडून केला जात आहे. सिद्धार्थ सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित असल्याने बुधवारी त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

Receive without pride, let go without attachment. #Meditations

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

(हे वाचा-सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीने मुंबई सोडली?इन्स्टाग्रामवर दिले संकेत)

दरम्यान मंगळवारी सुशांतचा त्याच्याबरोबर शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या संजना सांघीची चौकशी करण्यात आली. संजनाची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती. सुशांतचे कुटुंबीय, सिद्धार्थ पिठानी, त्याचा केअर टेकर दीपेश सावंत, सुशांतची जवळची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती, YRF चे कास्टिंग डिरेक्टर इ. अशा एकूण 30 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले आहेत.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: July 2, 2020, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading