सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीने मुंबई कायमची सोडली? इन्स्टाग्राम पोस्टमधून दिले संकेत

सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीने मुंबई कायमची सोडली? इन्स्टाग्राम पोस्टमधून दिले संकेत

सुशांत सिंह राजपूतच्या शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'मधील अभिनेत्री संजना सांघी चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली होती. मुंबईहून दिल्लीला परत जाताना संजनाने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)चा शेवटचा सिनेमा या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 'दिल बेचारा' (Dil Bechara) असं या चित्रपटाचं नाव असून त्यामध्ये सुशांतबरोबर संजना सांघी (Sanjana Sanghi) हा नवा चेहरा स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे चाहते आणि सेलिब्रिटींकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. वांद्रे पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सुशांतने हे  पाऊल का उचललं याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. 30 जून रोजी त्याच्याबरोबर शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या संजना सांघीची चौकशी करण्यात आली. संजनाची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली.

(हे वाचा-'सुशांतवरील #MeToo चा आरोप केवळ अफवा', या अभिनेत्रीचे पोलिसांकडे स्पष्टीकरण)

संजना चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली होती. मुंबईहून दिल्लीला परत जाताना संजनाने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने मुंबईत न परतण्याचे एक प्रकारे संकेत दिले आहेत की काय, असा प्रश्न सोशल मीडिया युजर्सना पडला आहे. संजनाने तिच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'खुदा हाफिज, मुंबई. 4 महिन्यानंतर तुझे दर्शन झाले. आता मी चालले दिल्लीला परत. तुझे रस्ते काहीसे वेगळे वाटले, सुनसान होते. कदाचित माझ्या हृदयातील दु:ख माझा दृष्टिकोन बदलत आहेत. किंवा तू सुद्धा थोड्या दु:खात आहेस. भेटूया? लवकरच, किंवा कदाचित नाही'. अशी स्टोरी तिने इस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की घडल्या प्रकारानंतर संजनाने मुंबईला कायमचे अलविदा तर केले नाही ना?

याआधी देखील संजना सुशांत सिंह राजपूतबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. तिचा हा पहिला चित्रपट आणि सुशांत तिचा पहिला ऑनस्क्रीन 'हिरो'. सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच सुशांतचं असं निघून जाणे तिच्या जिव्हारी लागल्याचे तिच्या पोस्टमधून दिसून येत आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 2, 2020, 8:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading