Home /News /entertainment /

बिनधास्त कंगना रणौतला आता वाटू लागली भीती; सोशल मीडियावर झाली व्यक्त

बिनधास्त कंगना रणौतला आता वाटू लागली भीती; सोशल मीडियावर झाली व्यक्त

कंगना रणौतने (kangana ranaut) बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींना लक्ष्य केलं आहे आणि त्यामुळे आता तिला एक चिंता सतावू लागली आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana ranaut) आपल्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती स्पष्ट बोलण्याबाबतही आहे. कंगना आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे मांडते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना तिनं लक्ष्य केलं आहे. प्रत्येक विषयावर ती मोकळेपणाने बोलते आता तिच्या मनात एका भीतीने घर केलं आहे. अभिनेत्री कंगना रणौत स्वत: सोशल मीडियावर नाही. याआधी तिची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेला आणि आता टीम कंगना रणौत हे ट्विटवर अकाऊंट तिची मतं सोशल मीडियावर मांडतं. हे ट्विटर कंगनाचं अधिकृत अकाऊंट मानलं जातं. मात्र रंगोलीचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर आता टिम कंगना रणौत अकाऊंटही सस्पेंड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. कंगनाच्या टीमने केलेल्या ट्वीटनुसार, "ट्विटरवर माझे मित्र विशेषत: मुव्ही माफिया आणि त्यांच्या अँटिनॅशनल आणि हिंदूफोबिक रॅकेटमध्ये असलेले, मी जे काही बोलते त्याला एकपक्षीय मानू शकतात. मला माहिती आहे इथं माझ्याजवळ खूप कमी वेळ आहे. ते कोणत्याही क्षणी माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करू शकतात. माझ्याकडे शेअर करण्यासारखं खूप काही आहे, मात्र मी या वेळेचा अधिक उपयोग त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी करेन" हे वाचा - सुशांतच्या मृत्यूदिवशी त्याच्या घरी दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? समोर आली तिची ओळख कंगनाने बॉलिवूडमधील अनेक मोठमोठे प्रोडक्शन हाऊस, फिल्म निर्माता, दिग्दर्शक यांच्यावर सातत्याने टिका केली आहे. तिने करण जोहर आणि महेश भट्ट यांना सर्वात जास्त लक्ष्य केलं आहे मात्र आदित्य चोप्रावरही निशाणा साधला आहे. कंगनाच्या टिमची भाषा खूपच कठोर अते. त्यामुळे या टिमचं अकाऊंट सस्पेंड करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Kangana ranaut

    पुढील बातम्या