मुंबई, 27 जून : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या अभिनेत्याने टीव्ही ते बॉलिवूड हा प्रवास करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या झगमगाटाच्या दुनियेत त्याने त्याची खास जागा मिळवली होती. पण शेवटच्या काळात असं काही घडलं की त्याने असच चमकत राहण्याऐवजी मृत्यूला कवटाळलं. सुशांतने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. सोशल मीडियावर सुशांतचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत, त्याच्या आठवणी अनेक जण शेअर करत आहेत. आज त्याला जाऊन 13 दिवस झाले आहेत, पण अजूनही त्याच्या नसण्याने अनेकांचे दु:ख तीळमात्रही कमी झाले नाही आहे. त्याचे कुटुंबीय तर पार कोलमडून गेले आहेत, मुख्य म्हणजे त्याचे वडील!
सोशल मीडियावर सुशांतच्या शोकसभेचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे, हा व्हिडीओ पाहून डोळ्यात नक्कीच पाणी तरळते. सोशल मीडियावर टीम सुशांत सिंह राजपूत या नावाने असणाऱ्या एका सुशांतच्या फॅनपेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
(हे वाचा-दूर गेलेला सुशांत इथे सापडणार! जिथे बालपण गेलं तिथे स्मारक बनवण्याचा निर्णय)
हा व्हिडीओ सुशांतच्या पटना येथील घराचा आहे, जिथे या प्रेयर मीटचे आयोजन करण्यात आले होते. सुशांतच्या आत्म्यास शांती मिळावी याकरता सुशांतचे कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. यामध्ये सुशांतचे वडील, त्याच्या बहिणी आणि इतर कुटुंबीय आहेत.
नुकताच सुशांतच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला आहे की सुशांतचे पटना याठिकाणी असणारे घर सुशांतचे मेमोरिअल बनवण्यात येणार आहे. याच घरामध्ये सुशांतने त्याचे बालपण घालवले आहे. सुशांतच्या जाण्याने त्याचा चाहतेवर्ग दु:खी आहे. आपला आवडता कलाकार आपल्यात नाही, हे दु:खच त्यांना सहन होत नाही आहे. अशावेळी ही मेमोरिअल सुशांतच्या चाहतेवर्गासाठी देखील खुले केले जाणार आहे. याठिकाणी सुशांतच्या काही वस्तू, त्याची पुस्तकं, त्याचा टेलिस्कोप ठेवण्यात येणार आहे. सुशांतच्या परिवाराने निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suicide, Sushant Singh Rajput