मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दूर गेलेला सुशांत इथे सापडणार! जिथे बालपण गेलं तिथे त्याचं स्मारक बनवण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

दूर गेलेला सुशांत इथे सापडणार! जिथे बालपण गेलं तिथे त्याचं स्मारक बनवण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

सुशांतच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला आहे की सुशांतचे पटना याठिकाणी असणारे घर सुशांतचे मेमोरिअल बनवण्यात येणार आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला आहे की सुशांतचे पटना याठिकाणी असणारे घर सुशांतचे मेमोरिअल बनवण्यात येणार आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला आहे की सुशांतचे पटना याठिकाणी असणारे घर सुशांतचे मेमोरिअल बनवण्यात येणार आहे.

  पटना, 27 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळत आहे. सुशांतला जाऊन आज 13 दिवस झाले तरी या दु:खातून त्याचा मित्रपरिवार, सहकलाकार, चाहते सावरले नाही आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांचे, त्याच्या वडिलांचे दु:ख तर अनाकलनिय आहे. दरम्यान या सगळ्या घटनांमध्ये सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठ्या धैर्याने एक निर्णय घेतला आहे.

  सुशांतच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला आहे की सुशांतचे पटना याठिकाणी असणारे घर सुशांतचे मेमोरिअल बनवण्यात येणार आहे. याच घरामध्ये सुशांतने त्याचे बालपण घालवले आहे. सुशांतच्या जाण्याने त्याचा चाहतेवर्ग दु:खी आहे. आपला आवडता कलाकार आपल्यात नाही, हे दु:खच त्यांना सहन होत नाही आहे. अशावेळी ही मेमोरिअल सुशांतच्या चाहतेवर्गासाठी देखील खुले केले जाणार आहे. याठिकाणी सुशांतच्या काही वस्तू, त्याची पुस्तकं, त्याचा  टेलिस्कोप ठेवण्यात येणार आहे. सुशांतच्या परिवाराने निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

  (हे वाचा-पहिल्यांदा असफल झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नात सुशांतने घेतला गळफास, पोलिसांना संशय)

  त्याचप्रमाणे सुशांतच्या परिवाराकडून एक त्याच्या नावाने एक फाऊंडेशन बनवण्यात आली आहे. ज्याअंतर्गत नवीन टॅलेंट, विद्यार्थी आणि खेळाडूंना पुढे जाण्यासाठी मदत मिळेल. सुशांत सिंह राजपूतच्या परिवाराने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

  सुशांतच्या कुटुंबीयांनी हे स्टेटमेंट जारी केले आहे. या स्टेटमेंटची सुरूवातच डोळ्यात पाणी आणणारी आहे. 'जगासाठी सुशांत सिंह राजपूत असणारा आमच्यासाठी गुलशन होता'. यामध्ये त्याच्या कुटुंबीयांनी यामध्ये म्हटले आहे की, 'सुशांत मुक्त होता, बोलका होता आणि खूप हुशार होता. त्याला सर्व गोष्टींबाबत कुतूहल वाटत असे. त्यांने बंधनाशिवाय स्वप्न पाहिली होती आणि एखाद्या सिंहाप्रमाणे त्या स्वप्नांचा पाठलाग केला होता. तो हसतमुख होता. तो आमच्या कुटुंबासाठी अभिमान आणि प्रेरणा होता'.

  यामध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे की, 'त्याचं सहज हासू आता आम्हाला ऐकू येणार नाही, त्याचे चकाकणारे डोळे आता आम्ही पाहू शकणार नाही. विज्ञानाबाबत त्याचे अविरत बोलणंही आता ऐकू येणार नाही, हे स्वीकारणं आमच्यासाठी कठीण आहे. त्याच्या जाण्याने परिवारात एक कायमस्वरुपी पोकळी निर्माण झाली आहे तीकधी भरून निघणार नाही. त्याने त्याच्या प्रत्येक चाहत्यावर प्रेम केले. आमच्या 'गुलशन'वर एवढे प्रेम करण्यासाठी मनापासून धन्यवाद'.

  त्याची आठवण कायमस्वरूपी राहावी याकरता त्याच्या कुटुंबीयांनी 'सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशन' (SSRF) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'जी क्षेत्र त्याच्या हदयाच्या एकदम जवळची होती-सिनेमा, विज्ञान आणि खेळ' यामधील नवीन टॅलेंटला सहकार्य करण्यासाठी या फाऊंडेशनची स्थापना करत आहोत', अशी घोषणा या स्टेटमेंटमधून करण्यात आली आहे.

  त्यात पुढे असे म्हटले आहे की, 'राजीव नगर, पटना याठिकाणी असणारे त्याच्या बालपणीच्या घराचे रुपांतर त्याच्या स्मारकात करण्यात येणार आहे. आम्ही त्याठिकाणी त्याच्या काही संस्मरणीय आणि वैयक्तिक वस्तू ठेवणार आहोत. यामध्ये त्याची पुस्तकं, त्याचा टेलिस्कोप इ.चा समावेश आहे. हे त्याच्या चाहत्यांसाठी आणि प्रशंसकांसाठी आहे. त्याच्या आठवणी जपण्यासाठी त्याचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेज एक लेगसी अकाउंट (Legacy Account) म्हणून सांभाळण्यात येईल. पुन्हा एकदा धन्यवाद- सुशांतचे कुटुंबीय'.

  संपादन  - जान्हवी भाटकर

  First published:
  top videos

   Tags: Sushant Singh Rajput