नवी दिल्ली 21 ऑगस्ट: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयने सुरु केल्याने अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. या प्रकरणी अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने चर्चेला दररोज नवं वळण मिळत आहे. सुशांतच्या पोस्ट मार्टेम रिपोर्टबद्दल शंका उपस्थित झाल्याने आता AIIMSची फॉरेन्सक टीम त्याच्या शरीरावरच्या जखमांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करणार असून त्याचा अहवाल सीबीआयला देणार आहे. ही आत्महत्या असेल की हत्या याबाबतही ही टीम आपलं मत व्यक्त करणार असल्याने या टीमचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे. सीबीआयने यासंदर्भात AIIMSला विनंती केली होती. त्यानुसार AIIMSच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडे असलेली कागदपत्र आणि सर्व रिपोर्ट्स यांचा अभ्यास करून ही समिती आपला रिपोर्ट देणार आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी देखील सीबीआयकडून करण्यात येणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रियाला कोणत्याही क्षणी सीबीआयकडून चौकशीकरता बोलावण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे रिया-सुशांतचा मित्र असणारा महेश शेट्टी (Mahesh Shetty) याला देखील सीबीआय चौकशीसाठी बोलावू शकते. तू म्हणाला होता आपण मरत नाही पण…; डोळ्यात अश्रू आणणारी सुशांतच्या भाचीची पोस्ट मृत्यूपूर्वी सुशांतने महेश शेट्टीला फोन केला होता. महेश नंतर त्याने रियाला देखील फोन केला होता. त्यामुळेच या दोघांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीबीआयचे अधिकारी गुरुवारी मुंबईत दाखल झाले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविल्यानंतर तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सीबीआयने यासाठी एका एसआयटीचं (SIT) गठन केलं आहे. सोनाक्षीचा ऑनलाइन छळ करणारा अटकेत; अभिनेत्री म्हणाली, “सावध राहा आता तुमचा नंबर” एसआयटीचं नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर करतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि आणि अॅडिशनल एसपी अनिल यादव या टीमचा भाग असतील. हे सर्व अधिकारी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.