मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"सुशांत प्रकरणात कंगना चुकीची, पद्मश्री पुरस्कार परत करावा", आदित्य पांचोलीने साधला निशाणा

"सुशांत प्रकरणात कंगना चुकीची, पद्मश्री पुरस्कार परत करावा", आदित्य पांचोलीने साधला निशाणा

मी चुकीची ठरले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन असं अभिनेत्री कंगना रणौतने म्हटलं होतं. तिच्या त्या वक्तव्यावरून आदित्य पांचोलीने तिला लक्ष्य केलं आहे.

मी चुकीची ठरले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन असं अभिनेत्री कंगना रणौतने म्हटलं होतं. तिच्या त्या वक्तव्यावरून आदित्य पांचोलीने तिला लक्ष्य केलं आहे.

मी चुकीची ठरले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन असं अभिनेत्री कंगना रणौतने म्हटलं होतं. तिच्या त्या वक्तव्यावरून आदित्य पांचोलीने तिला लक्ष्य केलं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 21 ऑगस्ट : अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) दिग्दर्शक करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार (padma shri) काढून घ्यावा अशी विनंती केंद्र सरकारला केली. त्यानंतर अभिनेते नसिरुद्दीन शाहा यांनी कंगनाला सुनावलं होतं. आता जिया खान प्रकरणात आरोपांचा सामना करणारा अभिनेता सूरज पांचोलीचे वडील अभिनेता आदित्य पांचोलीनेदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनानेच आता आपला पद्मश्री पुरस्कार परत द्यावा, असं आदित्य पांचोली (aditya pancholi) म्हणाला. सुशांत सिंह प्रकरणात मी चुकीचे ठरले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन असं कंगना रणौतने म्हटलं होतं. यावरून आदित्य म्हणाला, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगना रणौत चुकीची आहे. तिनं आपला पद्मश्री पुरस्कार परत करायला हवा, असं आदित्यने मुंबई मिररशी बोलताना म्हटलं आहे. सुशांतच्या सीबीआय प्रकरणाबाबत बोलताना आदित्य म्हणाला, या प्रकरणातील सत्य लवकर समोर येईल, त्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप आनंद होतो आहे. जो कुणी आरोपी असेल त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. ज्या निर्दोष लोकांवर बोट उचण्यात आलं आहे, त्यांनादेखील यामुळे आनंद झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आदित्यचा मुलगा सूरजचंही नाव जोडलं जात आहे. त्यावर अभिनेत्यानंही स्पष्टीकरण दिलं आहे. सूरज दिशाला ओळखत नव्हता आणि ते कधीच भेटले नव्हते असं त्याने सांगितल्याचं आदित्य म्हणाला. हे वाचा - "पद्मश्री काढून घ्या सांगायला राष्ट्रपती आहेस?" नसिरुद्दीन यांनी कंगनाला सुनावलं दरम्यान कंगनाने सुशांत प्रकरण आणि गुंजन सक्सेना चित्रपटावरून करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार सरकारने काढून घ्यावा, अशी विनंती केली होती. याबाबत तिनं ट्वीट केलं होतं,  "करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी विनंती मी भारत सरकारला करते. त्याने एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना मी ही इंडस्ट्री सोडून जाण्याबाबत भाष्य केलं होतं. त्याने सुशांतचं करिअर संपवलं, उरी हल्ल्यावेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता आणि आता आपल्या भारतीय सैन्याबाबत देशद्रोही फिल्म बनवली आहे" हे वाचा - तू म्हणाला होता आपण मरत नाही पण...; डोळ्यात अश्रू आणणारी सुशांतच्या भाचीची पोस्ट कंगनाच्या या ट्वीटनंतर नसिरुद्दीन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नसिरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, " सुशांतवर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवाच. मात्र त्याची एक प्रक्रिया असते. त्यात प्रत्येकवेळी आपण पडायलाच हवं असं नाही. कुणाचा पद्मश्री पुरस्कार घ्यायचा आणि कुणाचा नाही हे तिला सांगण्याचा अधिकार नाही. उलट आपल्यापैकी एकाला तिला तिची जागा दाखवण्याची हिंमत आहे", असं नाव न घेता त्यांनी कंगनाला लक्ष्य केलं आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिलं.
First published:

Tags: Kangana ranaut

पुढील बातम्या